शिंदे गटाकडून अडीच वर्ष महापौर पदाची मागणी; भाजपची पहिली प्रतिक्रिया समोर; बावनकुळेंचं लक्षवेधी वक्तव्य, म्हणाले...
मुंबई महापालिकेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या निवडणुकीत भाजपने 89 तर शिंदेंच्या शिवसेनेनं 29 जागा जिंकल्या आहेत. त्यानंतर आता महापौर कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच आपल्याला अडीच वर्षे महापौरपद मिळाव, अशी मागमी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं केली असल्याचं समजतं आहे.
याच चर्चांवर आता भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांना शिंदे गटाच्या मागणीच्या चर्चांबाबत विचारण्यात आलं. यावर बोलताना, अशी मागणी आमच्यापर्यंत आली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ''आमच्या पर्यंत अशी कोणतीही मागणी अद्याप आलेली नाही. जेव्हा अशी कोणती मागणी येईल, तेव्हा आमचं पार्लमेंटरी बोर्ड त्यावर चर्चा करेन'' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.पुढे बोलताना ''यांदर्भातील चर्चा माध्यमांत होत नसते. आमची महायुतीची समन्वय समिती आहे. त्यात एकनाथ शिंदे आणि अजित पवार देखील आहे. आम्ही बसून याबाबत चर्चा करू. महापौर पदाची जी काही चर्चा होईल, ती देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात होईल, पत्रकारांशी या चर्चा होत नसतात, असंही त्यांनी नमूद केलं.दरम्यान, भाजप-शिवसेना महायुतीने मुंबई महापालिकेत बहुमताचा आकडा गाठला आहे. भाजपने 89 तर तर शिंदेंच्या शिवसेनेनं 29 जागा जिंकल्या आहेत. पण आरक्षणाची सोडत न निघाल्याने याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. अशातच शिंदेंनी आपल्या नगरसेवकांना मुंबईतील एका हॉटेलमध्ये ठेवलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.