भारताची ऑलिम्पिक पदक विजेती आणि सहा वेळा विश्वविजेती ठरलेली दिग्गज बॉक्सर म्हणजे मेरी कॉम . मेरीचं सध्या वैयक्तिक आयुष्य फारच चर्चेत आहे. मेरीचा डिवोर्स झाला असून तेव्हापासून आरोप आणि प्रत्यारोप सुरु झाले आहे. मेरी आता पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. यावेळी कारण ठरले आहेत तिचा माजी पती करुंग ओन्खोलरने (ओनलर), मेरी कॉमवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. काही दिवसांपूर्वी मेरी कॉमने आपल्या माजी पतीवर कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप केला होता. तिच्या म्हणण्यानुसार, ओन्खोलरमुळेच तिला मौल्यवान जमीनही गमवावी लागली. मात्र आता ओन्खोलरने हे सर्व आरोप साफ फेटाळून लावत प्रतिआरोपांचा पाढा वाचला आहे.
काय म्हणाला ओन्खोलर?
न्यूज एजन्सी IANS शी बोलताना ओन्खोलरने म्हटले की, त्याच्यावर लावलेले सर्व आरोप खोटे आहेत. "मेरी कॉमने मालमत्तेचा विषय काढत माझे नाव कागदपत्रांतून काढून टाकण्यास सांगितले. माझ्यावर 5 कोटी रुपये चोरल्याचा आरोप केला जात आहे. माझे बँक खाते तपासून पाहा. 18 वर्षे आम्ही एकत्र संसार केला, आणि आज माझ्याकडे काय आहे? मी सध्या दिल्लीमध्ये भाड्याच्या घरात राहतो." असे तो म्हणाला.
'माझा वापर करून टाकून दिलं'- ओन्खोलर
ओन्खोलरने भावनिक प्रतिक्रिया देत सांगितले की, "मी त्यांना माफ करू शकतो, पण माझ्यासोबत जे वागणूक दिली गेली ते विसरू शकत नाही. माझा फक्त वापर करण्यात आला आणि नंतर मला बाजूला सारण्यात आलं. मेरी कॉम बॉक्सिंग अकादमीची पायाभरणी कोणी केली? रजिस्ट्रेशन कोणी केलं? आज त्या अकादमीचा चेअरमन दुसराच आहे, ज्याचं नाव मी घेणार नाही. या सगळ्यामुळे मला प्रचंड मानसिक वेदना झाल्या आहेत."
मेरीवर अफेअरचेही गंभीर आरोप
ओन्खोलरने आणखी खळबळजनक दावा करत म्हटले की, मेरी कॉमचे लग्नात असतानाच इतर व्यक्तींशी संबंध होते. "2013 साली तिचं एका कनिष्ठ बॉक्सरसोबत अफेअर होतं. त्यामुळे आमच्या कुटुंबांमध्ये मोठा वाद झाला होता, पण नंतर समेट झाला. मात्र 2017 नंतर मेरी कॉम बॉक्सिंग अकादमीतीलच एका व्यक्तीसोबत तिचे संबंध सुरू होते," असा आरोप त्याने केला. आपले दवे खरे आहे आणि त्याची पुष्टी करण्यासाठी त्याच्याकडे पुरावे असल्याचेही ओन्खोलरने सांगितले. "त्या काळातील व्हॉट्सअॅप मेसेजेस माझ्याकडे आहेत. त्या व्यक्तीचं नावही मला माहीत आहे, पण मी आतापर्यंत शांत राहिलो," असे तो म्हणाला. या आरोप-प्रत्यारोपांमुळे मेरी कॉम आणि तिच्या वैयक्तिक आयुष्यावरील वाद पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.