सांगली :- सांगली ग्रामीण पोलीसांच्या हद्दीत अवैधधंध्याचा जणू महापूरच आल्याचा दिसत आहे. ग्रामीण हद्दीत मटका, हातभट्टी दारू, स्पा व पत्याचा क्लब या अवैध धंदा जोमात सुरु असून पोलीस प्रशासनाने पूर्णपणे डोळेझाकलेले आहेत असेच यावरून दिसत आहे.धामणी गावात तर ऊत आला आहे.
गावातील लोकांनी याबाबत आवाज उठवण्याचा प्रयत्न केला असला तरी आवाज दाबण्याचा मोठा प्रयत्न झाला आहे. असे चर्चीला जाते.असले तरी आता तरुण वर्गातून या अवैध धंदे बंद करण्याचा आता विडा उचल्याचे दिसत आहे. रात्री उशीरा पर्यन्त यागावातील परमिटरूम, पत्याचा क्लब, हातभट्टी व स्पा चालू असल्याचे दिसत आहे? यावर कुणाचा एवढा मोठा वरदहस्त आहे. याची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. यावर आता पोलीस अधीक्षक कारवाई करणार का? याकडे ग्रामीण भागातील तरुण, वृद्ध व महिला यांचे लक्ष लागले आहे.आता महापालिका निवडणूक लागली असून, आचारसंहिता पण आहे अशातच या अवैध धंदे मोठया प्रमाणात सुरु असून यावर नियंत्रण येणार का? नाही याकडे ग्रामस्थांचे लक्ष आहे. याबाबत " सांगली दर्पण " ने मध्यनंतरी आवाज उठवला होता त्यावेळी काही प्रमाणात नियंत्रण आले होते पण नंतर येरे माझ्या... झाले आहे. यासर्व अवैध धंद्याचा मोहरक्या कोण याला कोणाचा आशीर्वाद आहे याची ग्रामस्थामध्ये चर्चा रंगली असून याबाबत पोलीस अधीक्षक लक्ष घालणार का? असा सवाल होत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.