Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

1800 कोटींचं पॅकेज नाकारलं; गुगल, ॲपल, मेटाला नाचवणारा 'सुपरस्टार' रुओमिंग पँग कोण? गोटात खेचण्यासाठी दिग्गजांमध्ये रस्सीखेच

1800 कोटींचं पॅकेज नाकारलं; गुगल, ॲपल, मेटाला नाचवणारा 'सुपरस्टार' रुओमिंग पँग कोण? गोटात खेचण्यासाठी दिग्गजांमध्ये रस्सीखेच
 

मार्क झुकरबर्गच्या मेटा प्लॅटफॉर्म्स या कंपनीत 1800 कोटींच्या पॅकेजवर नोकरी करणाऱ्या रुओमिंग पँग केवळ सात महिन्यात मेटाला रामराम करून आता OpenAI कंपनीत रुजू झाले आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे एकीकडे लाखो लोकांच्या नोकऱ्यांवर गदा येत असताना टेक कंपन्या कोट्यवधी रुपयांच्या ऑफर्स देत आहेत. मार्क झुकरबर्गच्या मेटा या कंपनीत 1800 कोटींच्या पॅकेजवर रुजू झालेल्या रुओमिंग पँगला ओपनएआयने मोठी ऑफर देऊन कंपनीत सामील करून घेतले आहे. यामुळे ओपनएआयच्या कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधनाला बळकटी मिळाली आणि आयटी बाजारातील उच्च प्रतिभेसाठी स्पर्धा तीव्र झाली.रुओमिंग पँग कोण आहे

रुओमिंग पँग कोण आहे" 
रुओमिंग पँगला मेटाला झुगारून नवीन संधी हाती घेण्यासाठी 1800 कोटींचा पगारही रोखू शकला नाही. पँग आता मेटा सोडून ओपनएआयमध्ये रुजू झाला असून हा आयटी सुपरस्टार तज्ञ कोण आहे, ज्याच्यासाठी दिग्गज कंपन्यांमध्ये रस्सीखेच होत आहे? गेल्या 12 महिन्यांत पँगने तिसऱ्यांदा जॉब स्विच केला असून पहिले ॲपल, मग Meta मध्ये आणि आता AI जगताचा नवा राजा OpenAI साठी काम करेल.

काही महिन्यांपूर्वीच ॲपल सोडून मार्क झुकरबर्गच्या मेटा प्लॅटफॉर्म्समध्ये रुजू झालेले चर्चित AI रिसर्चर रुओमिंग पँगने पुन्हा जॉब स्विच केला आणि आता OpenAI कंपनीचा भाग बनले आहेत. ओपनएआयच्या प्रवक्त्याचा हवाला देत द इन्फॉर्मेशनने ही माहिती दिली. अहवालानुसार, पँगला आपल्या गोट्यात सामील करण्यासाठी ओपनएआय अनेक महिन्यांपासून प्रयत्नशील होते. अखेरीस त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि पँगने मेटा सोडण्याचा निर्णय घेतला. 
गेल्या वर्षीच ॲपलला केलेले रामराम" 
मेटामध्ये असताना पँगने सुपरइंटेलिजेंस लॅब्समध्ये एआय इन्फ्रास्ट्रक्चर इनिशिएटिव्हचे नेतृत्व केले. ही लॅब पुढील पिढीतील एआय मॉडेल्स विकसित करण्यासाठी ओळखली जाते. तर, मेटामध्ये रुजू होण्याआधी पँग अ‍ॅपलमध्ये मॉडेल डेव्हलपमेंटचे प्रमुख होते आणि गेल्या वर्षीच मेटामध्ये रुजू झालेले. पँगला 20 अब्ज डॉलर म्हणजे सुमारे 18.2 अब्ज रुपयांचा पॅकेज दिला होता, ज्यामध्ये काही परफॉर्मंस माईलस्टोनचाही समावेश होता.

ॲपलपेक्षा मेटाची ऑफर ठरली वरचढ

मेटासाठी हा मोठा धक्का मानला जात असून अ‍ॅपलने पँगला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण मेटाने त्याला एक मोठे पॅकेज देऊ केले, जो अ‍ॅपलच्या सीईओ आणि इतर अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या सामान्य पगारापेक्षा खूपच जास्त होते. अ‍ॅपल या ऑफरशी जुळवून घेऊ शकले नाही.

मेटा देते सर्वाधिक सॅलरी पॅकेज" 
मेटाच्या सुपरइंटेलिजेंस लॅब्समधील कर्मचाऱ्यांना दिले जाणारे कम्पन्सेशन स्ट्रक्चर अमेरिकन कंपन्यांमध्ये सर्वात आकर्षक मानले जाते. तसेच बऱ्याच प्रकरणांमध्ये पॅकेजेस जागतिक स्तरावरील प्रमुख बँकांमधील सीईओंच्या पगाराइतके किंवा त्याहूनही जास्त असतात. मात्र, यापैकी बहुतेक पॅकेजेस कामगिरीवर आधारित असतात, दीर्घकालीन गुंतवणूकीशी जोडलेले असतात. म्हणजे, कर्मचारी लवकर निघून गेले किंवा मेटाचा स्टॉक खराब कामगिरी करत असेल तर त्यांना त्यांचे पूर्ण वेतन गमवावे लागू शकते.
रुओमिंग पँग इतका भाव का?" 
 
रुओमिंग पँगच्या महत्त्वाचा यावरूनच अंदाज लावला जाऊ शकतो की मेटाने त्याला एआय संशोधन शास्त्रज्ञ म्हणून सामील होण्यासाठी 200 दशलक्ष डॉलर्स (अंदाजे 1800 कोटी रुपये) चे मोठे पॅकेज देऊ केले होते. जुलै 2025 मध्ये मेटामध्ये सामील होण्यापूर्वी पँग अ‍ॅपलमधील एआय मॉडेल्स टीमचे प्रमुख होते, पण या एआय शर्यतीत आपली आघाडी कायम ठेवण्यासाठी ओपनएआयने हार मानली नाही आणि शेवटी पँगला सामील केले.

भरगच्च सॅलरी पॅकेजला मारली लाथ" 
इतकं सर्व देऊ करूनही मेटाचे प्रयत्न रुओमिंगला रोखण्यात कमी पडले, ज्यांनी ओपनएआयमध्ये सामील होण्यासाठी कंपनी सोडली. पँगच्या या निर्णयामुळे पुन्हा एकदा AI तज्ञांचे महत्त्व दिसून स्पष्ट दिसून शकते आणि कंपन्या या संधीवर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यास मागेपुढे पाहत नसून एआय शर्यतीत पुढे राहण्यासाठी कंपन्या उघडपणे लाखो डॉलर्सच्या ऑफर्स देत आहेत.

गूगलनेही केले प्रयत्न" 
पँगने आतापर्यंतच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा आणि प्रमुख काळ गुगलमध्ये घालवला. 2006 ते 2012 दरम्यान त्याने बिगटेबल इंडेक्स सारख्या क्रांतिकारी प्रकल्पांचा पाया घातला, तर गुगलच्या जागतिक अधिकृतता प्रणाली, झांझिबारची सह-स्थापना केली, जी आयटीतील मैलाचा दगड आहे. गुगल ब्रेनमध्ये असताना पँगने बेबेफिश सारख्या सखोल शिक्षण फ्रेमवर्कवर काम केले, जे गुगलच्या स्वतःच्या डेटा सेंटर्समध्ये (TPUs) सर्वाधिक वापरले जाणारे सिस्टम बनले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.