दादांचा अपघात आणि 200 पट ताकदीचं गुपित! रोहित पवारांचा 'त्या' नेत्यावर अत्यंत गंभीर आरोप
राष्ट्रवादी काँग्रेसचे (राशप) आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात नवा 'बॉम्ब' टाकलाय. निवडणुकीतील मार्गदर्शक प्रमाणपत्रावरून एका बड्या नेत्यावर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत.
"निवडणुकीत 'मार्गदर्शक कागदांचे' नियोजन दादा स्वतः करायचे, मात्र त्याचे वितरण दुसऱ्याच नेत्याच्या हाती होते," असा खळबळजनक दावा रोहित पवारांनी केला आहे. 28 जानेवारीला या मार्गदर्शक कागदांच्या माध्यमातून 200 पट ताकद लावण्याचे ठरले असताना, दादांच्या अपघातानंतर केवळ 50 पटच ताकद लावण्यात आली, असे म्हणत रोहित पवार यांनी पुन्हा एकदा खळबळजनक विधान केले आहे.
रोहित पवारांचा रोख कोणावर?
रोहित पवार यांनी 18 फेब्रुवारी रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नेत्याचं नाव न घेता म्हटलं की, "आजच्या राजकारणात निवडणूक लढत असताना मार्गदर्शक प्रमाणपत्र आणि कागदांची आवश्यकता असते. मोठी निवडणूक असेल तर मार्गदर्शक कागद जास्त लागतात, छोटी निवडणूक असेल तर कमी लागतात. पण दादांचा हा अपघात होण्यापूर्वी सर्व नियोजन दादा करायचे पण मार्गदर्शक कागदांचं डिस्ट्रिब्युशन हे दुसरा कुठला तरी नेता करायचा. 28 जानेवारी रोजी या मार्गदर्शक कागदांचे नियोजन झालं होतं. 200 पट ताकद या मार्गदर्शक कागदांच्या माध्यमातून येथे लावली जाणार, असा निर्णय झाला होता. दुर्दैवानं 28 जानेवारीची घटना घडली. या मार्गदर्शक कागदांच्या माध्यमातून 200 पट ताकद लावली जाणार होती, पण दादा नसताना फक्त 50 पटच ताकद लावली, त्यामुळे उमेदवार (राष्ट्रवादी अजित पवार) दादा नसताना कमकुवत पडले-एकटे पडले,अशी चर्चा आहे. दीडशेपट ताकद कोणी कमी लावली आणि का कमी लावली? हे देखील पाहावं लागेल".
रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, अजितदादा यांच्या दुर्दैवी विमान अपघाताबाबत काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्न उपस्थित केले होते, त्यानंतर तपासाला काहीशी गती आली असली तरी अद्यापही अपेक्षित वेगाने तपास होत नाही. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांत अपघाताबाबत #VSR कंपनीची संशयास्पद भूमिका, कंपनीच्या मालकाचे राजकीय लागेबांधे, विमान कंडीशन, पायलटची मनःस्थिती, ब्लॅक बॉक्समधील डेटाबाबत निर्माण झालेल्या शंका, तपासाला वेगळं वळण देण्यासाठी होणारा मानवी हस्तक्षेप आदी अनेक मुद्दे निदर्शनास आले आहेत. याबाबत दुसऱ्यांदा सविस्तर प्रेझेंटेशनसह पत्रकार परिषद घेऊन हा तपास निष्पक्ष होण्यासाठी देशाबाहेरील दोन एजन्सीची मदत घेण्याची आणि देशाचे व या तपासावर लक्ष ठेवण्यासाठी राज्याचे आणि देशाचे विरोधी पक्षनेते, कुटुंबातील आणि पक्षातील प्रतिनिधी आणि काही तज्ज्ञांची समिती नेमण्याची मागणी केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.