मुंबई : राज्याचं कामकाज ज्या वास्तूमधून पाहिलं जातं त्याच मंत्रालयामध्ये लाचखोरीचा प्रकार समोर आला आहे. मंत्रालयामध्ये अन्न व औषधी प्रशासन विभागामध्ये एका कर्मचाऱ्याला लाच स्विकारताना रंगेहाथ पकडलं आहे. मंत्रालयामध्येच लाचखोरीचा प्रकार घडल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज गुरुवारी 12 जानेवारी 2026 रोजी मंत्रालयातलं कामकाज संपत असताना ही घटना उघडकीस आहे. संध्याकाळी 6:06 वाजता मंत्रालयातील अन्न आणि औषधी प्रशासन विभाग दुसरा मजल्यावर आलोसे राजेंद्र ढेरंगे या क्लर्कने लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडलं आहे. आलोसे ढेरंगे याने एका तक्रादाराला मेडिकलचा परवाना निलंबन रद्द करण्यासाठी मदत करण्यासाठी पन्नास हजार रुपयांची लाच मागितली होती. पण, तक्रारदाराकडे इतकी रक्कम नव्हती अखेरीस तडजोडीअंती ३५ हजार रुपये देण्याची बोली झाली.तक्रारदाराने या बद्दल लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंत्रालयात सापळा रचला आणि आलोसे राजेंद्र ढेरंगे याला ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना मंत्राालयात रंगेहात पकडण्यात आलं आहे. लाचलुचपत विभागााच्या अधिकाऱ्यांनी ढेरंगेला ताब्यात घेतलं असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून महायुती सरकारवर टीका केली आहे. "मंत्रालयात एका कॅबिनेट मंत्र्यांच्या कार्यालयात एसीबीने सापळा रचून एका लाचखोर अधिकाऱ्याला ताब्यात घेतल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. महाभ्रष्ट महायुती सरकारच्या कारकिर्दीत मंत्रालयात खुलेआम लाचखोरी आणि कमिशनखोरी सुरू असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. जनतेची कामे पैशाशिवाय होत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, ही अत्यंत गंभीर बाब आहे. मुख्यमंत्र्यांनी संबंधित प्रकरणाची दखल घेऊन जनतेला माहिती द्यावी आणि लाचखोर मंत्र्याला पदावरून हटवावे' अशी मागणी सपकाळ यांनी केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.