Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Big News! "विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली?", संजय राऊतांनी शेअर केला धक्कादायक व्हिडीओ

Big News! "विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली?", संजय राऊतांनी शेअर केला धक्कादायक व्हिडीओ
 

"विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली?", असे म्हणत उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, यात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे काही माणसांसोबत दिसत आहेत.

यातील एका व्यक्तीला मारहाण करण्यात आल्याचेही दिसत आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे नव्या व्हिडीओमुळे चर्चेत आले आहेत. खासदार संजय राऊतांनी एक व्हिडीओ शेअर करत "विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला आहे! तुम्ही सांगताय की मी सांगू?", असा सवालही केला आहे. व्हिडीओ एक महिला आणि काही लोक राहुल नार्वेकर यांच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीला पकडतात आणि त्याला मारहाण करतात. वाद सुरू झाल्यानंतर राहुल नार्वेकर हे पुढे चालत जातात. ते बोलण्याचा प्रयत्न करतात आणि तसेच निघून जातात. हा व्हिडीओ अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावातील आहे. दुसऱ्याच्या जागेत विनापरवानगी प्रवेश केल्यामुळे हा वाद झाला. जागा मालकाने यावरूनच राहुल नार्वेकर यांना जाब विचारला. त्यानंतर जे घडले ते सगळे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.