Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मद्यधुंद युवकाचा पोलिसावर हल्ला; उपनिरीक्षकाचा गणवेश फाडला

मद्यधुंद युवकाचा पोलिसावर हल्ला; उपनिरीक्षकाचा गणवेश फाडला
 

घरगुती वादाची पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या मद्यधुंद व्यक्तीने पोलिसावर हल्ला करून त्याचा गणवेश फाडल्याची धक्कादायक घटना गिट्टीखदान पोलिस ठाण्यात घडली. याप्रकरणी आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, अनिल श्रीराम निंबुळकर ऊर्फ समिर पठाण (वय ४०, रा. जाफरनगर, रिंग रोड, मानकापूर, नागपूर) हा बुधवारी (ता.४) रात्री ११.३० ते १२.०० वाजताच्या सुमारास त्याची सासू समशुन मिसो मोहम्मद इस्माईल यांच्यासोबत घरगुती कारणावरून वाद झाल्याने गिट्टीखदान पोलिस ठाण्यात आला होता. तेव्हा तो मद्यधुंद अवस्थेत होता. पोलिस ठाण्यात तो सासूला जोरजोरात ओरडून शिवीगाळ करत असल्याने रात्रपाळीवर असलेले पोलिस उपनिरीक्षक चांदखान साहेबखान पठाण यांनी त्याला समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आक्रमक होत त्यांच्या अंगावर धावला. पठाण यांचा पोलिस गणवेश फाडून आरोपीने हातबुक्क्यांनी मारहाण केली. यामुळे शासकीय कर्तव्यात अडथळा आला. याप्रकरणी चांदखान पठाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.