Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

संसदेत गदारोळ! राहुल गांधी म्हणाले, "मी काय बोलू ते तुम्हीच सांगा" अन् सभापतींचा पारा चढला

संसदेत गदारोळ! राहुल गांधी म्हणाले, "मी काय बोलू ते तुम्हीच सांगा" अन् सभापतींचा पारा चढला
 

देशाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात रविवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केंद्रीय अर्थसंकल्प मांडला. त्यानंतर सोमवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर चर्चा सुरु होती. देशाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात रविवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केंद्रीय अर्थसंकल्प मांडला. त्यानंतर सोमवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर चर्चा सुरु होती. 
 
यावेळी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी या अभिभाषणावर बोलण्यास उठले आणि त्यांनी मनोज नरवणे यांच्या पुस्तकाचा संदर्भ दिला. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यावर आक्षेप घेतला. त्यानंतर राहुल गांधी यांनी आपले म्हणणे रेटण्याचा प्रयत्न केला पण थेट लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनीच त्यांना थांबवले आणि केवळ राष्ट्रपतींच्या अभिभाषणासंबंधी बोलावे अशी सूचना केली. यावर "मी काय बोलू ते तुम्हीच सांगा" अशी टिप्पणी राहुल गांधींनी केली.

संसदेत नेमके काय घडले?
राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा करताना नरवणे यांच्या पुस्तकाचा संदर्भ देण्यास सुरुवात केली. हा संदर्भ चीन-भारत द्विपक्षीय संबंधांबाबत होता. पण नरवणे यांचे हे पुस्तक अद्याप प्रकाशित झालेले नाही, असे म्हणत राजनाथ सिंह यांनी यावर आक्षेप घेतला. त्यानंतर राहुल गांधी यांनी या पुस्तकातील काही बाबी छापून आलेल्या मासिकाचा संदर्भ देण्याची इच्छा व्यक्त केली. पण पुस्तक प्रकाशित झालेले नसल्याने मासिकातील माहिती अधिकृत किंवा विश्वासार्ह मानली जाऊ शकत नाही, असा आक्षेप गृहमंत्री अमित शाह यांनी नोंदवला. त्यानंतर राहुल गांधी यांनी पुस्तक व मासिक बाजूला ठेवून केवळ त्या संदर्भातील परिस्थितीचे वर्णन करण्यास सुरुवात केली.

लोकसभा सभापतींचा पारा पडला...

अखेर लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी राहुल गांधी यांना बोलण्यापासून थांबवले. प्रकाशित न झालेली किंवा विश्वासार्हता नसलेली कुठलीही माहिती सदनात देणे योग्य नाही. तसेच अभिभाषणासंदर्भातच बोलावे लागेल असा नियमच बिर्ला यांनी दाखवला. त्यावर शेवटी राहुल गांधी ओम बिर्ला यांना म्हणाले की, "मी काय बोलू ते तुम्हीच सांगा". यावर ओम बिर्ला यांनी स्पष्टपणे सांगितले की, तुम्ही राष्ट्रपतींच्या अभिभाषणात असलेल्या विषयांबद्दल बोललात किंवा सरकारी धोरणांवर टीका केलीत तर तुम्हाला कुणीही बोलण्यापासून अडवणार नाही. पण जर तुम्ही एखाद्या विषयावर दिशाभूल करणारी माहिती सदनात देत असाल तर मात्र तुम्हाला ते बोलता येणार नाही. मग मला नाईलाजाने तुम्हाला खाली बसवून पुढील लोकसभा सदस्याला बोलण्याची संधी द्यावी लागेल.

अखेर सभागृहाचे कामकाज स्थगित
ओम बिर्ला यांनी राहुल गांधी यांना स्पष्टपणे सांगूनही त्यांनी चीन-भारत विषयावरील मुद्दा पुढे रेटण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सत्ताधारी खासदारांकडून यावर गोंधळ घालण्यात आला. अखेर ओम बिर्ला यांनी लोकसभेचे कामकाज स्थगित केले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.