Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'ललकार'ची तिसरी पिढी पत्रकारितेचा वसा पुढे नेत आहे, हे कौतुकास्पद !पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून गौरवउदगार:, दैनिक ललकार कार्यालयास सदिच्छा भेट

'ललकार'ची तिसरी पिढी पत्रकारितेचा वसा पुढे नेत आहे, हे कौतुकास्पद ! पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून गौरवउदगार:, दैनिक ललकार कार्यालयास सदिच्छा भेट
 
 
सांगली:- दै. ललकारचे संपादक बापूसाहेब खराडे यांनी स्वातंत्र्योत्तर काळापासून अत्यंत खडतर परिस्थितीतून दैनिक ललकार सुरू केला आणि त्याचा विस्तार केला आज त्यांची तिसरी पिढी पत्रकारितेचा बसा पुढे नेत आहे, ही बाथ कौतुकास्पद आहे, असे गौरबोद्‌गार सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले.

७२ गेल्या वर्षाची है. ललकारची वाटचाल जाणून घेण्यासाठी आजसांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगली येथील पत्रकार नगरातील ललकार कार्यालयास सदिच्छा भेट दिली, त्यावेळी त्यांचे संपादक सुभाष खराडे बांनी स्वागत केले. त्यानंतर चंद्रकांतदादा पाटील यांनी कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घेतला.

यावेळी बोलताना चंद्रकांतदादा पाटील माणाले की, दै. ललकारचे संपादक बा.द. खराडे यांच्यावर जीवघातक हल्ला झाला. त्यांना एक डोळा गमवावा लागला. संपूर्ण बेहरा जळाला मात्र त्यांनी न डगमगता आपली पत्रकारीता सुरूच ठेवली. त्यांच्यानंतर त्यांचे पूत्र सुभाष खराडे हे सध्या संपादक म्हणून काम पाहत आहेत. तर तिसऱ्या पिढीतील ऋषिकेश खराडे आणि आमरनाथ खराडे हे कार्यकारी संपादक म्हणून ललकारची धुरा सांभाळत आहेत. समाज जागृतीचे कार्य त्यांच्या हातून होत असून ते निश्चितच कौतुकास्पद आहे, असेही ते म्हणाले. आणि ते पत्रकारीतेचा घेतलेला बसा आणखीन बळकट होवो, असेही ते म्हणाले. 
 
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा संपादक सुभाष खराडे यांनी शाल, श्रीफळ, विठ्ठलाची मुर्ती आणि संस्थापक संपादक बापूसाहेब खराडे यांनी लिहिलेल्या 'पत्रकारीतेतील झंझावात' या आत्मचरित्र्याची प्रत देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा यांनी खराडे परिवाराची आस्थेने चौकशी केली. संपादक सुभाष खराडे यांच्या पत्नी सौ. अरुणा खराडे, त्यांच्या सुनबाई सौ. वेदिका खराडे तसेच मातोश्री श्रीमती विमल खराडे यांची भेट घेऊन त्यांचाही त्यांनी गौरव केला. यावेळी भाजपाचे प्रसिद्धी प्रमुख केदार खाडीलकर, माजी नगरसेवक अजित अडवाणी, पालकमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बादव, त्यांचे सहकारी ज्येष्ठ पत्रकार हणमंत मोहिते, चंद्रकांत क्षीरसागर, अमोल मदवाण्णा, निशिकांत यादव, सुरेश नानवाणी आदी मान्यवर उपस्थित होते.
 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.