सांगली :- 'किलकारी' मोबाईल व्हॅनचा प्रारंभ; गर्भवती महिला, माता,
बाळाच्या आरोग्याची माहिती मिळणार:,मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे
सांगली : जिल्हा परिषदेच्या 'किलकारी' मोबाईल व्हॅनचा प्रारंभ झाला. किमान चार महिन्यांची नोंदणी झालेली गर्भवती महिला आणि एक वर्षाखालील बाळ असलेल्या कुटुंबांसाठी ती उपयुक्त आहे. ही व्हॅन आटपाडी, जत, शिराळा, मिरज, वाळवा या तालुक्यांतील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट देणार आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांनी व्हॅनला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, शशिकांत शिंदे, आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. सुमेध कुदळे, कार्यक्रम अधिकारी डॉ. पल्लवी जवरे आदी उपस्थित होते. ही व्हॅन आटपाडी, जत, शिराळा, मिरज, वाळवा तालुक्यांतील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट देणार आहे. आरोग्याधिकारी डॉ. वाघ यांनी सांगितले की, 'किलकारी' ही फिरती आरोग्य सेवा आहे. यामध्ये फोनवर माहिती दिली जाते.
किमान चार महिन्यांची नोंदणी झालेली गर्भवती महिला आणि एक वर्षाखालील बाळ असलेल्या कुटुंबांसाठी ती उपयुक्त आहे. गर्भवती महिलांची माहिती आरोग्य विभागाच्या पोर्टलवर नोंदविली जाते. त्यातील मोबाईल क्रमांकावरून आरोग्य सेवांची माहिती गर्भवतींपर्यंत पोहोचविली जाते. 'किलकारी' सेवेच्या लाभासाठी गर्भधारणेची किंवा प्रसूतीची नोंदणी मोबाईल क्रमांकासह आशा कार्यकर्ता किंवा आरोग्य केंद्रात करावी लागते. या सेवेचा क्रमांक १६००४०३६६० आहे. त्यावरुन बाळ १ वर्षाचे होईपर्यंत महिन्यातून एकदा कॉल येतो. कॉल ऐकण्यासाठी १४४२३ किंवा १८००५३२१२५५ या क्रमांकावर डायल करता येते. 'किलकारी' सेवा मोफत असून ग्रामीण भागातील नागरिकांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.