सांगलीत दि. १ आणि २ मार्च रोजी अजिंकीयन्स वूमन फौंडेशनच्या वतीने आयोजित ऐशानी एक्झिबिशन भव्य प्रदर्शन व विक्री
सांगली : अजिंकीयन्स वूमन फौंडेशनच्या वतीने नेहमीच महिलांना सक्षम व सबलीकरण करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. विविध उपक्रम राबवून महिलांमध्ये आत्मविश्वास व उद्योजकता या गुणांच्या वाढीस चालना दिली जाते. दरवर्षी प्रमाणे महिलांना सर्वच क्षेत्रात आर्थिक दृष्टया सक्षम करण्याच्या उद्देश्याने अजिंकीयन्स वूमन फौंडेशनच्या वतीने संस्थापिका मंजिरी गाडगीळ व स्मिता घेवारे यांनी नेमिनाथ नगरमधील राजमती भवन येथे रविवार, १ मार्च आणि सोमवार, २ मार्च २०२६ रोजी सकाळी 10 ते रात्री 9 पर्यन्त 'ऐशानी एक्झिबिशन ' या भव्य प्रदर्शन व विक्रीचे आयोजीत केले आले आहे. तसेच या उपक्रमाला १८३२ पासूनची प्रदीर्घ परंपरा लाभलेले मे. पुरुषोत्तम नारायण गाडगीळ (PNG) सराफ आणि ज्वेलर्स यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
प्रदर्शनाची प्रमुख आकर्षणे: प्रदर्शनात नाविन्यपुर्ण वस्तू, कुर्तीज, इमिटेशन ज्वेलरी, साड्या, हस्तकलेच्या कलाकृतीचे, तसेच खाद्यपदार्थाचे स्टॉल्स असे विविध स्टॉल्स लावण्यात येणार आहेत. दर्जेदार साड्या, डिझायनर वेअर आणि आधुनिक फॅशनचा अनोखा संगम एकाच ठिकाणी खरेदी करता येणार आहे. या प्रदर्शनात नाविन्यपूर्ण वस्तू, कुर्तीज ,इमिटेशन ज्वेलरी, साड्या आणि हस्तकलेच्या नवंनव्या कलाकृतींचे स्टॉल खाद्यपदार्थ फ्रेश फूड स्टॉल आहेत.महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी कटिबद्ध असेलेल्या अजिंकीयन्स वुमन फाऊंडेशनच्या वतीने हे एक्झिबिशन आयोजित करण्यात आले आहे. अजिंक्यन वुईमेन फाऊंडेशनच्या माध्यमातून महिला उद्योजिकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात एक ब्रेक हवाच यासाठी महिलांनी थोडा वेळ काढून सर्व महिलानी या एक्झीबिशन ला भेट देण्याचे आवाहन अजिंकीयन्स वूमन फौंडेशनच्या वतीने संस्थापिका मंजिरी गाडगीळ व स्मिता घेवारे यांनी केले आहे.कार्यक्रमाचा तपशील:दिनांक: १ व २ मार्च २०२६वेळ: सकाळी १०:०० ते रात्री ९:०० वाजेपर्यंतस्थळ: राजमती भवन, नेमिनाथ नगर, सांगली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.