Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भाजपचे आमदार सत्यजित देशमुखांची कन्या विजयी

भाजपचे आमदार सत्यजित देशमुखांची कन्या विजयी


सांगली : शिराळ्याचे भाजपचे आमदार सत्यजित देशमुख यांच्या कन्या साईतेजस्वी देशमुख यांनी विजयाचा गुलाल उधळला. भाजपचा सहयोगी पक्ष असलेल्या जनसुराज्य पक्षामार्फत त्यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती.

विदेशात शिक्षण घेतलेल्या साईतेजस्वी यांच्या लढतीकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते.

आमदार देशमुख यांनी कन्येच्या विजयासाठी ताकद लावली होती. त्याला यश आले असून साईतेजस्वी या विजयी झाल्या आहेत. त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून पहिलीच निवडणूक लढवली होती. कोकरूड जिल्हा परिषद मतदारसंघाच्या त्या प्रतिनिधीत्व करीत आहेत. भाजपनेते सम्राट महाडिक यांसारख्या स्थानिक भाजप नेत्यांनीही त्यांना ताकद दिली होती. विधान परिषदेचे प्रदीर्घ काळ सभापती राहिलेल्या शिवाजीराव देशमुख यांच्या त्या नात आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.