भारताकडून दारूण पराभव, पाकिस्तानात फुटले टीव्ही; सोशल मीडियावर उडाली खिल्ली:,दिल्ली पोलिसांची 'लय भारी' पोस्ट
विश्वचषकात कोलंबो येथे झालेल्या हायव्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवला. पाकिस्तानचा पराभव करत भारताने आपला दबदबा सिद्ध केला. इशान किशनच्या वादळी फलंदाजीनंतर
गोलंदाजांनी भेदक मारा केल्यामुळे भारताने पाकिस्तानचा दारूण पराभव केला.
विश्वचषकात पाकिस्तानविरोधात हा ८ वा विजय आहे. टीम इंडियाच्या विजयानंतर
भारतामध्ये जल्लोष जोरात सुरू होता. पण दुसरीकडे पाकिस्तानमध्ये टीव्ही
फुटत होते. भारताकडून पराभव होताच पाकिस्तानच्या चाहत्यांचा राग अनावर
झाला. पाकिस्तानच्या चाहत्यांनी पुन्हा एकदा टीव्ही फोडले. याचे व्हिडिओ
व्हायरल झाले आहे. भारताने पाकिस्तानचा पराभव करताच सोशल मीडियावर मिम्सचा
पाऊस आलाय. सोशल मीडियावर पाकिस्तानची खिल्ली उडवली.
पाकिस्तानी चाहत्यांचा संताप, पराभव होताच पुन्हा फुटले टीव्ही!
भारताकडून
मिळालेल्या पराभवानंतर पाकिस्तानी चाहत्यांमध्ये प्रचंड निराशा पाहायला
मिळाली. सोशल मीडियावर एका चाहत्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
व्हिडिओत तो रागाच्या भरात आपल्या घरचा टीव्ही फोडताना दिसत आहे. "भारताने
पुन्हा हरवलं, संतापून टीव्ही फोडला," अशी पोस्ट व्हिडिओवर लिहिली आहे. इतर
अनेक चाहत्यांनीही आपण "शॉक आणि डिप्रेशन" मध्ये असल्याचे म्हटले आहे.
"आमच्याकडे बुमराहचं उत्तर नाही!"
सामना संपल्यानंतर स्टेडियमबाहेर पाकिस्तानी चाहत्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट निराशा दिसत होती. मकबूल नावाच्या एका पाकिस्तानी समर्थकाने कबुली दिली की, "आमच्याकडे बुमराह आणि हार्दिक पांड्यासारख्या खेळाडूंचा सामना करण्याची ताकद नाही. टीम इंडियाचं होमवर्क खूप पक्कं असतं. गेल्या २०-२५ वर्षांपासून भारतच किंग आहे."
दिल्ली पोलिसांची 'लय भारी' पोस्ट
टीम
इंडियाच्या विजयानंतर देशात जल्लोषाचे वातावरण आहे. भारताच्या विजयानंतर
दिल्ली पोलिसांनी पाकिस्तानची खिल्ली उडवली. एक्सवर दिल्ली पोलिसांनी एक
पोस्ट केली आहे. दिल्ली पोलिसांच्या पोस्टची सध्या चर्चा होत आहे.
"चुकीच्या जागी U-turn घेतलात, तर असाच मार खावा लागेल!" दिल्ली
पोलिसांच्या या मिश्किल टिप्पणीने नेटकऱ्यांची मनं जिंकली असून
पाकिस्तानच्या पराभवाशी जोडून लोक त्यावर मजेशीर कमेंट्स करत आहेत.
सोशल मीडियावर मिम्सचा महापूर
भारताने पाकिस्तानचा दारूण पराभव केल्यानंतर फेसबुक, इंस्टाग्राम आणि X वर मिम्सचा पाऊस पडत आहे. भारतीय चाहत्यांनी 'मौका-मौका' पासून ते पाकिस्तानच्या खराब फलंदाजीपर्यंत अनेक विषयांवर मिम्स बनवून त्यांची फिरकी घेतली आहे. हा विजय चाहत्यांसाठी केवळ एक सामना नसून तो एका मोठ्या उत्सवासारखा साजरा केला जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.