Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

इस्लाम, हलाला प्रथेवर बोलणं सलीमच्या अंगाशी आलं, पोटावर, गळ्यावर चाकू फिरवला आणि..

इस्लाम, हलाला प्रथेवर बोलणं सलीमच्या अंगाशी आलं, पोटावर, गळ्यावर चाकू फिरवला आणि..
 

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एक व्यक्तीवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले आहे. या हल्ल्यात व्यक्ती गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्याची देखील माहिती समोर येत आहे. सांगायचं झालं तर, संबंधित व्यक्ती सतत इस्लाम धर्म आणि हलाला या मुस्लीम प्रथेविरोधात स्वतःचं स्पष्ट मत मांडत होता. ज्यामुळे त्याच्यावर हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. कथिर आरोपींनी व्यक्तीला सांगितलं होतं की, इस्लाम आणि हलाला या मुद्द्यांवर काहीही बोलू नकोस. तरी देखील तो सतत इस्लाम धर्माच्या विरोधात बोलत राहिला. अखेर आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला.

संबंधित प्रकरण गाझियाबाद जिल्ह्यातील लोणी येथील अली गार्डन कॉलनी येथील रहिवासी असलेल्या युट्यूबर सलीम वास्तिक याचं आहे. सलीम त्याच्या ऑफिसमध्ये बसलेला होता. तेव्हा काही गुंड सलीम याच्या ऑफिसमध्ये घुसले आणि धारदार शस्त्राने गंभीर वार केले. आरोपींनी सलीम याच्या आधी गळ्यावर आणि त्यानंतर पोटावर वार केले… ज्यामुळे सलीम गंभीर जखमी झाला आणि त्याला जीडीबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सलीम वास्तिक एक युट्यूबर आहे आणि त्याचं सलीम वास्तिक 0007 नावाचं चॅनल आहे. 
 
घडलेल्या प्रकरणानंतर पोलिसांनी कसून चौकशी सुरु केली आहे. इस्लामविरुद्ध सतत होत असलेल्या वक्तव्यांमुळे ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. सलीम वास्तिक मुस्लिम समाज, कुराण, मदरसे आणि मुहम्मद यांच्या वाईट गोष्टींवर उघडपणे भाष्य करत असल्यामुळे त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. सलीम वास्तीक स्वतःला एक्स मुस्लिम म्हणतात, म्हणजे पूर्व मुस्लिम… सलीम यांच्या म्हणण्यानुसार, इस्लाममध्ये अनेक अशा वाईट प्रथा आहेत, ज्या कुठेतरी थांबल्या पाहिजे. याच विरोधात सलीम कायम सांगत असतात.

युट्यूबर सलीम वस्तिक हा मूळचा गाझियाबादमधील लोणी येथील आहे. त्याने लोणी येथील आझाद शाळेत शिक्षण घेतलं आणि धार्मिक शिक्षण देखील त्यांनी घेतलं. सोशल मीडियावर सलीम यांचे 28 हजार फॉलोअर्स आहेत… सलीम यांनी इस्लामला परदेशी धर्म म्हणून वर्णन केलं आणि मुस्लिमांमध्ये हिंदूंबद्दल नकारात्मक धारणा का आहे? असा प्रश्न वारंवार उपस्थित केला. ते मुस्लिम समाजाच्या सामाजिक-आर्थिक स्थितीवरही टीका करतात.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.