इटलीमध्ये विंटर ऑलिम्पिक्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा सुरु होताच ऑलिम्पिक व्हिलेजमधील खेळाडूंनी तीन दिवसांत १० हजार कंडोमचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. यावर आता विविध प्रतिक्रिया देखील उमटू लागल्या आहेत.
इटालियन वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, या स्पर्धेच्या आयोजकांनी खेळाडूंना मोठ्या प्रमाणात मोफत कंडोम उपलब्ध करून दिले होते. मात्र या खेळाडूंनी तीन दिवसांतच या कंडोमचा वापर केला आहे. या बाबत बोलताना एका खेळाडूने सांगितंल, की "कंडोम्सचा साठा तीन दिवसांत संपला आहे. आणखी कंडोम येणार असल्याचं सांगितलं आहे, पण ते कधी येतील याबाबत माहिती नाही" हा प्रकार समोर येताच सोशल मीडियावर मीम्स व्हायरल झाल्या आहेत. काहींनी ही बाब वैयक्तिक असल्याचं सांगत अशा गोष्टी जाहीरपणे चर्चेत येऊ नयेत असं मत व्यक्त केलं आहे. तर अनेकांनी ऑलिम्पिक व्हिलेजची जुनी 'प्रतिमा' आठवत "१० हजार पुरेसे नसणार हे आधीच माहित होतं" अशी खिल्ली उडवली आहे.ही स्पर्धा जिथे आयोजित करण्यात आली आहे, त्या लोम्बार्डी प्रदेशाचे गव्हर्नर Attilio Fontana म्हणाले की खेळाडूंना ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये मोफत कंडोम दिले जाणार असल्याची घोषणा आम्ही आधीच केली होती. पण ते इतक्या लवकर संपतील असं वाटलं नव्हतं. दरम्यान, ऑलिम्पिकमध्ये कंडोम वितरीत करण्याची पद्धत नवी नाही. १९८८ च्या Seoul Summer Olympics पासून लैंगिक आजारांविषयी जनजागृती करण्यासाठी ही परंपरा सुरू करण्यात आली होती. तेव्हापासून प्रत्येक स्पर्धेत खेळाडूंनी कंडोम दिली जात आहे. अशातच यंदा हे कंडोम तीन दिवसांत संपल्याने चर्चेचा विषय बनला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.