Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत दहावी परीक्षा जिल्हापरिषदेच्या निगराणीखाली; कॉपीमुक्त मोहिमेला वेग

सांगलीत दहावी परीक्षा जिल्हापरिषदेच्या निगराणीखाली; कॉपीमुक्त मोहिमेला वेग
 
 
सांगली: दहावीच्या परिक्षेला शुक्रवारपासून प्रारंभ झाला. जिल्हाभरात १०५ परीक्षा केंद्रावर ३९ हजार ६३२ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. जिल्हा परिषदेने दहावीच्या विद्यार्थ्यावर मोबाईल कॅमेऱ्यांव्दारे लक्ष ठेवले आहे. सिसीटीव्ही बरोबरच वर्गात बसवण्यात आलेल्या या मोबाईल कॅमेऱ्यांची कॉपबहाद्दारांनी चांगलीच धास्ती घेतल्याचे चित्र आहे. तर परिक्षेच्या वर्गावर थेट जिल्हापरिषदेतून नजर ठेवण्यात येत असल्याने शिक्षकांनाही कायम अलर्ट रहावे लागत आहे.


एकूण ६९७ माध्यमिक शाळांमध्ये एक हजार ६१८ वर्गात ही परीक्षा होत आहे. परीक्षा सुरू असणारे सर्व वर्ग मोबाईल झूम प्रणालीने जोडण्यात आले आहेत. वर्गात मागील बाजूस मोबाईल बसवण्यात आला आहे. त्याव्दारे परीक्षा कालावधीत थेट प्रक्षेपण जिल्हा परिषदेत पाहिले जाते. मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे, यांच्यासह वरिष्ठ अधिकारी झुम मोबाईच्या माध्यमातून परीक्षेवर लक्ष ठेऊन आहेत. शंभर टक्के कॉपीमुक्त परीक्षेचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी या मोबाईल झूम अॅपचा मोठा हातभार लागत आहे.
 
सर्व केंद्रात सीसीटीव्ही वॅ मेरेडी बसवण्यात आले आहेत. वॅ मेरे नसलेल्या केंद्रातील कर्मचाऱ्यांची अन्य केंद्रात परीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. मोबाईलवरून थेट प्रक्षेपणासाठी शालेय शिक्षण विभाग आणि परीक्षा बोर्डाची परवानगी घेण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील दक्षता समितीने या उपक्रमाला मंजूरी दिली आहे. शुक्रवारी पहिल्याच पेपरवेळी या यंत्रणेचा परिणाम दिसून आला. मोबाईलव्दावरे थेट प्रक्षेपणाच्या वेबकास्टिंग उपक्रमामुळे परीक्षा शंभर टक्के कॉपीमुक्त होत आहेत. प्रत्येक वर्गातील हालचालीवर जिल्हापरिषदेतून लक्ष ठेवण्यात येत असल्याने शिक्षक आणि पालकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले आहे. 



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.