Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वीज वापर तोच, पण बिल दुप्पट! सांगलीत स्मार्ट मीटरविरोधात संताप उसळला

वीज वापर तोच, पण बिल दुप्पट! सांगलीत स्मार्ट मीटरविरोधात संताप उसळला

सांगली : महावितरण कंपनीकडून स्मार्ट मीटर बसवण्याच्या पहिल्या टप्प्यात ग्राहकांनी त्याला विरोध दर्शवला. काही ठिकाणी मीटर बसवले, मात्र बिले अव्वाच्या सव्वा आली. त्यावरून वाद झाला.


आता महावितरणने ग्राहकांची संमती न विचारता मीटर बसवण्याचा घाट घातला आहे. 'स्मार्ट मीटर पंधरवडा' या नावाखाली ही मोहीम सुरू करण्यात आली असून त्याविरोधात लोकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अचूक बिलिंग, पारदर्शकता, सवलती आदी सारेच फसवे आहे. आम्हाला हे मीटर नकोच, अशी नागरिकांची भूमिका आहे. त्यामुळे ठेकेदार व ग्राहकांमध्ये वाद अटळ आहे.

'महावितरण'ने येत्या ९ ते २३ फेब्रुवारी दरम्यान स्मार्ट मीटर जनजागृती पंधरवडा जाहीर केला आहे. या काळात महावितरणचे कर्मचारी घरोघरी जाऊन स्मार्ट मीटरविषयीची जागृती करणार आहेत. गेल्या दोन वर्षापासून स्मार्ट मीटरबाबत वाद प्रवाद सुरू आहेत.

मात्र सरसकट या मीटरची सक्ती केली जणार आहे. त्यासाठी नवी मीटर्स जागेवरच बसवली जाणार आहेत. एका बाजूला प्रबोधन करणार असे सांगताना ती सरसकट बसवली जाणार असल्याचेही महावितरणच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

यापूर्वी ग्राहकांनी विरोधक करताना ही मीटर्स ऐच्छिक असल्याचे सांगत आक्रमक आणि सक्तीची भूमिका टाळली होती. त्यावेळी ग्राहकांना नकाराचा पर्याय होता. आता मात्र तो पर्यायच नसेल.

महावितरणचे प्रसिद्धी अधिकारी विश्‍वजित भोसले म्हणाले, 'तंत्रज्ञान बदलते आहे. यांत्रिक उपकरणांपासून ते डिजिटल आणि स्मार्ट तंत्रज्ञानापर्यंतचा प्रवास आपण अनुभवत आहोत. घड्याळ, टीव्ही, रेडिओ, कॉम्प्युटर, मोबाईल यांसारख्या साधनांप्रमाणेच आता वीज मोजणीच्या क्षेत्रातही स्मार्ट तंत्रज्ञानाने प्रवेश केला आहे.

याच पार्श्वभूमीवर महावितरण ग्राहकांसाठी स्मार्ट टीओडी वीजमीटर बसवत आहे. कंपनी वीजबिलांच्या अचूकतेला प्राधान्य देत आहे. टीओडी मीटरमुळे अंदाजे बिलिंगचा काळ संपला आहे. प्रत्येक युनिटचा अचूक हिशेब होतो. ग्राहकांना दर तासाला वीजवापराची माहिती मोबाईलवर उपलब्ध होते. काही वेळेत वीजदरात सवलत मिळते.'

ते म्हणाले, 'स्मार्ट मीटरमुळे यापुढे घर बंद असल्याने मीटर नोंद नाही हा विषयच निकालात निघेल. बिलात अचुकता येईल. या मीटरमधील टीओडी प्रणालीमुळे वीजदरात थेट सवलत मिळते. सकाळी ९ ते सायंकाळी या कालावधीत वापरलेल्या विजेसाठी प्रतियुनिट ८० पैसे ते १ रुपया सवलत १ जुलै २०२५ पासून लागू आहे. ते मीटर मोफत बसवले जात आहे.

ही मीटर पोस्टपेड असून मासिक बिलेच येतील. स्मार्ट मीटरमुळे वीजदर वाढतील असा गैरसमज आहे. प्रत्यक्षात अनेक ग्राहकांची बिले कमी आली आहेत. सौर ऊर्जेसाठी तर स्मार्ट मीटर गरजेच आहे. कधीही एवढी रक्कम भरावी लागली नव्हती. अचानक दीडपट बिल येणे म्हणजे स्पष्ट लूट आहे. आम्हाला मीटर नको आहेत. मात्र जोडणी सक्तीने केली आहे.

- शिवाजी पाटील, कवलापूर

स्मार्ट मीटर लावल्यावरच बिल वाढायला लागले. महावितरण सवलतीची भाषा करते; पण आमच्या खिशातूनच जास्त पैसे जात आहेत.

- रामदास पाटील, बुधगाव

गेल्या दोन वर्षापासून आमच्याकडे स्मार्ट वीज मीटर विरोधात तीन हजारांवर तक्रारी दाखल झाल्या आहेत. आम्ही वीज नियामक आयोगाकडे तक्रारी दिल्या आहेत. ताज्या सुनावणीत १६ टक्के वीज दरवाढ केली आहे. अशाच पद्धतीने वीज मीटरचीही रक्कम वसुली होणार आहे. ग्राहकांनी वीज मीटर बसवण्याआधी आधीच्यांचे अनुभव लक्षात घ्यावेत. आम्हीही ग्राहकांचे पुढील पंधरा दिवस प्रबोधन करणार आहोत.

- सतीश साखळकर, नागरिक जागृती मंच

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.