मशीन नोटा मोजून गरम झालं, हात रबरबॅण्ड बांधून थकले, तरी पैसे नाही संपले, इंजिनियरच्या घरी सापडलं घबाड
बेंगळुरू: भ्रष्टाचाराच्या विरोधात मोहिन हातात घेतल्यानंतर लोकायुक्त पोलिसांनी शिक्षण विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर निशाणा साधला.
उत्पन्नापेक्षा जास्त संपत्तीच्या प्रकणारत केलेल्या या कारवाईमध्ये प्रशासकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. कर्नाटक निवासी शैक्षणिक संस्था असोसिएशन (KREIS) चे अधीक्षक अभियंता एचएम जनार्दन यांच्याविरुद्ध बंगळुरु ग्रामीण लोकायुक्त पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा जास्त आणि बेकायदेशीरपणे संपत्ती जमवल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर आहे.
बेंगळुरूच्या लोकायुक्तांनी पीडब्ल्यूडीचे मुख्य अभियंता पुरुषोत्तम यांच्या घरावर मोठा छापा टाकला. गुरुवारी सकाळी पद्मनाभनगर येथील त्यांच्या आलिशान तीन मजली बंगल्यावर दोन वाहनांमध्ये 10 पेक्षा जास्त अधिकाऱ्यांचे पथक गेले होते. पाच ते सहा तासांपासून सुरू असलेल्या या छाप्यामध्ये लाखो रुपये रोख सापडले. मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने आणि असंख्य मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, पुरुषोत्तम यांनी अलीकडेच हे आलिशान घर बांधले होते आणि एक भव्य गृहप्रवेश समारंभ आयोजित केला होता. लोकायुक्तांना त्यांच्याविरुद्ध बेहिशेबी मालमत्ता आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. सध्या, सर्व कागदपत्रांची तपासणी केली जात आहे आणि ताब्यात घेतलेला वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.