Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला थेट मोदींचा हिरवा कंदील? खळबळजनक दावे, सुप्रिया सुळेंना केंद्रीय मंत्रिपदाची चर्चा

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला थेट मोदींचा हिरवा कंदील? खळबळजनक दावे, सुप्रिया सुळेंना केंद्रीय मंत्रिपदाची चर्चा
 
 
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अकाली निधन झाल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण करण्याच्या हालचालींना वेग आल्याचा दावा मुख्यत्वे राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांकडून केला जात आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सावध भूमिकेत असून सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी या चर्चा उडवून लावल्या आहेत. अशातच राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा कंदील दाखवल्याचा दावा केला जात आहे.

अजित पवार यांनी सुरु केलेल्या हालचाली

शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून दोन्ही गटांचे विलीनीकरण ही अजित पवारांची इच्छा असल्याचे ठामपणे सांगितले जात आहे. तर सुनेत्रा पवारांकडे नेतृत्व असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सावध पवित्रा घेतला आहे. अशातच याबाबत नवी माहिती 'एबीपी न्यूज'ने दिली आहे. शरद पवारांना सोडल्याचा डाग अजितदादांना पुसायचा होता, तसंच बहीण सुप्रिया सुळेंसोबतचं नातंही पुन्हा नव्याने जोडायचं होतं, त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रि‍करणाच्या हालचाली वेगवान झाल्याचं बोललं जातं.
 
चर्चांना सुरुवात कधी?
नागपूर अधिवेशनावेळी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या बैठका झाल्या. अजित पवार यांनी याविषयी देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घातल्याचा दावा केला जात आहे. फडणवीसांनी याबद्दल केंद्रात बोलावं लागेल, असं सांगितलं. त्यानंतर अजितदादा आणि अमित शाह यांच्यात अहिल्यानगरमध्ये याविषयी बोलणी झाल्याची माहिती आहे. पुढे शाहांची मोदींसोबत चर्चा झाली आणि केंद्रातून ग्रीन सिग्नल आला. १६ जानेवारीला अजित पवार यांच्यासोबत सुप्रिया सुळे, रोहित पवार, जयंत पाटील, अमोल कोल्हे यांच्यात बैठक झाली. याबद्दल शरद पवारांना सांगण्यात आलं. तर जिल्हा परिषद निवडणुका दोन्ही गटांनी 'घड्याळ' चिन्हावर लढवण्याचा निर्णय झाला.

अजित पवार यांनी सुरु केलेल्या विलीनीकरणाच्या प्रयत्नांना त्यांच्याच पक्षातील नेत्यांची साथ नव्हती, असंही म्हटलं जात आहे. कारण शरद पवार यांची राष्ट्रवादी संसदेत दादांपेक्षा ताकदवान आहे. तो गट अजित दादांच्या पक्षात विलीन झाला असता सु्प्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिपद, एका नेत्याला (जयंत पाटील किंवा रोहित पवार) राज्यात कॅबिनेट मंत्रिपद किंवा राज्यमंत्रिपद असा प्रस्ताव होता. त्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांना मोदी सरकारमध्ये मंत्रिपद मिळवण्याचा मार्ग अवघड झाला असता.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.