Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पोलीस दलात खळबळ! नवी मुंबई पोलीस खात्यातील वरिष्ठ निरीक्षक निलंबित

पोलीस दलात खळबळ! नवी मुंबई पोलीस खात्यातील वरिष्ठ निरीक्षक निलंबित
 
 
नवी मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी यांना निलंबित करण्यात आले आहे. यांच्यावर फसवणुकीच्या तक्रार अर्जाची सखोल चौकशी न करता, तो परस्पर दप्तरी दाखल करून आरोपींना अटकपूर्व जामीन मिळण्यास मदत केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. दरम्यान पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

ब्रम्हानंद नाईकवाडी हे सध्या नवी मुंबई पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्षात कार्यरत आहेत . सप्टेंबर २०२५ मध्ये दाखल झालेल्या फसवणुकीच्या तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. युनूस कासम सोत व उमेश मनहरलाल उधानी यांच्यात भूखंड तडजोड कराराच्या नावाखाली फसवणूक झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. ४ सप्टेंबर २०२५ रोजी दिलेल्या तक्रार अर्जावर गुन्हा दाखल न करता, दि. ११ ऑक्टोबर २०२५ रोजी तो अर्ज परस्पर दप्तरी दाखल करण्यात आला. या त्रुटीचा फायदा घेत संबंधित आरोपींनी बेलापूर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवला होता. या सुनावणीवेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नाईकवाडी स्वतः न्यायालयात हजर न राहता दुय्यम अधिकाऱ्यास पाठवण्यात आल्याचा ठपकाही ठेवण्यात आला आहे. यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणारे, बेजबाबदार वर्तन ठरल्याने ब्रम्हानंद नाईकवाडी यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.