Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

संतापजनक! प्रसाधनगृहांबाहेर छत्रपती शिवराय आणि महाराणी पद्मिनी यांचे फोटो; व्हिडीओ व्हायरल झाल्याने संतापाची लाट

संतापजनक! प्रसाधनगृहांबाहेर छत्रपती शिवराय आणि महाराणी पद्मिनी यांचे फोटो; व्हिडीओ व्हायरल झाल्याने संतापाची लाट
 

हरियाणातून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. सिक्री येथील एका बँक्वेट हॉलमधील प्रसाधनगृहांबाहेर दिशादर्शक म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी पद्मिनी यांचा फोटो लावण्यात आला आहे. पुरुष आणि महिला प्रसाधनगृहांबाहेर फोटो लावण्यात आल्याने सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. याबाबत एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नागरिक आणि इतिहासप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

हरियाणातील घटना
समोर आलेल्या माहितीनुसार, हरियाणातील सिक्री परिसरात असलेल्या मिलान बँक्वेट हॉलमधून हा संतापजनक प्रकार समोर आला आहे. हॉलमधील प्रसाधनगृहांच्या फलकावर छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी पद्मिनी यांचा फोटो लावण्यात आला आहे. याप्रकरणी व्हिडिओ समोर आल्यानंतर सर्वांनी संताप व्यक्त केला.
फोटो हटविण्यात आल्याची माहिती

सोशल मीडियावर याप्रकरणी तीव्र संताप व्यक्त करण्यात आल्यानंतर मिलान बँक्वेट हॉलच्या प्रसाधनगृहांबाहेर लावलेला छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी पद्मिनी यांचा फोटो हटविण्यात आल्याची माहिती आहे. याठिकाणी आता दुसरा फोटो लावण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणी बँक्वेट हॉलच्या चालकांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
 
राजकीय नेत्यांकडून निषेध
या घटनेचा आमदार जितेंद्र आव्हाड तसेच, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी निषेध व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार पक्ष) आमदार जितेंद्र आव्हाड यांना याबाबत प्रश्न विचारला असता याप्रकरणी नाराजी व्यक्त करत निषेध केला. ‘महाराज त्यांना माफ करो’, असे आव्हाड म्हणाले. रामदास आठवले यांनी देखील याप्रकरणी दोन्ही फोटो हटवून बँक्वेट हॉलच्या मालकांनी माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली. कारवाई न झाल्यास आरपीआयचे कार्यकर्ते ते काम करतील, असा इशाराही आठवले यांनी दिला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.