Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

उद्धव ठाकरेंची सोबत राज मुंबईत सत्तेत बसणार? भाजपाला थेट समर्थन? स्वत: म्हणाले, 'मी सांगतोय..'

उद्धव ठाकरेंची सोबत राज मुंबईत सत्तेत बसणार? भाजपाला थेट समर्थन? स्वत: म्हणाले, 'मी सांगतोय..'
 

महापौर पदाच्या निवडणुकीत मनसे सभागृहात भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची शक्यता या बातम्यांमधून व्यक्त करण्यात आली. महायुतीच्या सध्या 121 संख्या असल्याने सभागृहात आणखी पाठिंबा घेण्याच्या तयारीत भाजप असून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी कांग्रेस यांना सोबत घेतल्यानंतर महापौर पदासाठी भाजपकडून खेळी करत राज ठाकरेंना सोबत घेतलं जाईल अशी चर्चा या बातम्यांमुळे रंगली मनसेच्या समर्थनानंतर भाजपाला एकूण 127 नगरसेवकांचा पाठिंबा असेल असं सांगण्यात आलं.

महापौर निवडीला वेग

मुंबई महापौर निवड प्रक्रियेला कालपासूनच वेग आल्याचं दिसून येत आहे. भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि शिवसेना नेते राहुल शेवाळे महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेतली आहे. भाजप आणि शिवसेनेच्या गटनेता निवडीनंतर महायुतीच्या नेत्यांची आयुक्तांसोबत चर्चा होणार आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात महापौर होण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानचा या बैठकीला जाण्यापूर्वी शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि खासदार राहुल शेवाळेंनी एक सूचक विधान केलं. महायुतीला राज ठाकरे पाठिंबा देत असतील तर आमची काही हरकत नाही असं मत राहुल शेवाळेंनी नोंदवलं. "मनसेनं जर मुंबईत मबायुतीला पाठींबा देत असेल तर स्वागतच आहे," असं विधान राहुल शेवाळेंनी केलं. 
 
उद्धव ठाकरेंची साथ सोडणार राज?
राहुल शेवाळेंच्या विधानामुळेच खरोखरच मनसे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची साथ सोडून सत्तेत सहभागी होणार की काय अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली. मुंबईतील मनपा निवडणुकींमध्ये ठाकरे बंधू हे महायुतीमधील शिंदेंची शिवसेना आणि भाजपाविरुद्ध लढली आहे. भाजपा आणि शिंदे सेनेला आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळाला असल्याने त्यांच्या नगरसेवकांची संख्या वाढली आहे. त्यातच आता राज ठाकरेंच्या मनसेचे सात नगसेवकही सत्तेत सहभागी होणार अशी जोरदार चर्चा होती. मात्र या चर्चांना स्वत: राज ठाकरेंनी पूर्णविराम दिला आहे.
स्वत: राज ठाकरेंनी दिलं उत्तर

वांद्रे पूर्व येथील एमआयजी क्लबमध्ये राज ठाकरेंनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक घेतली. या बैठकीनंतर संवाद साधताना मोठा खुलासा केला आहे. मुंबई महानगरपालिकेत तुम्ही भाजपासोबत जाणार का? असा सवाल पत्रकारांनी विचारला. यावर राज यांनी नाही असं उत्तर दिलं. त्यानंतरही पुन्हा याच अशयाचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राज यांनी, "मी सांगतोय ना भाजपसोबत जाणार नाही," असं उत्तर देत चर्चांना पूर्णविराम दिला.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.