Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Breaking News! सांगलीत हरभट रोडवर मद्यधुंद इनेव्हा गाडीच्या चालकाने 7-8 जणांना उडवले गंभीर जखमी

Breaking News! सांगलीत हरभट रोडवर मद्यधुंद इनेव्हा गाडीच्या चालकाने 7-8 जणांना उडवले गंभीर जखमी
 

सांगली :- हरभट रोडवर आज सायंकाळी 7 च्या सुमारास मध्यधुंद अवस्थेत असणाऱ्या इनोव्हा गाडीच्या चालकाने 7- 8 जणांना उडवले चालकाला नागरिकांनी त्याला अक्षरशः धरून तुडवले. हरभट रोडवर नेहमीच गर्दी असते त्यात कृष्णामाई महाउत्सव असल्याने गर्दी होतीच त्यात हा गोंधळ झाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत. इनोव्हा कार अत्यंत वेगात होती. गणपती पेठ परिसरात पहिली धडक दिल्यानंतर चालकाने गाडी न थांबवता पुढे टिळक चौकाच्या दिशेने धाव घेतली. या दरम्यान तीन ते चार दुचाकींचा कारने चक्काचूर केला.

टिळक चौकात मोठ्या प्रमाणात गर्दी असतानाच इनोव्हा कार त्या गर्दीत घुसली. काही पादचारी आणि दुचाकीस्वार भरधाव वेगामुळे जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर संतप्त झालेल्या जमावाने इनोव्हा चालकाला पकडून बेदम चोप दिला. यानंतर जमावाने कारची तोडफोड केली. या तोडफोडीत इनोव्हा गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू असून चालक मद्यधुंद अवस्थेत होता का, याचीही चौकशी केली जात आहे.




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.