Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Breaking News ! "माझ्यासारखे २४२ आमदार आहेत म्हणून तुझा मुख्यमंत्री आहे", शिंदेंसेनेचे आमदार बाबर यांचे विधान, भाजपा नेत्याला दिले चॅलेंज

Breaking News ! "माझ्यासारखे २४२ आमदार आहेत म्हणून तुझा मुख्यमंत्री आहे", शिंदेंसेनेचे आमदार बाबर यांचे विधान, भाजपा नेत्याला दिले चॅलेंज
 

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. राजकीय पक्ष एकमेकांना लक्ष्य करताना दिसत आहे. शिंदेसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी भाजपाच्या स्थानिक नेत्यावर घणाघाती टीका करताना थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बाण डागला. तुझ्या मुख्यमंत्र्याला जाऊन विचार, सुहास बाबर कोण आहे? असे म्हणत शिंदेंच्या आमदाराने भाजपा नेत्याला एक आव्हानही दिले. सांगली जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपा आणि शिंदेसेना यांच्यात जोरदार राजकीय वॉर सुरू आहे. भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी शिंदेसेनेचे आमदार सुहास बाबर यांच्यावर प्रचारसभेतून टीका केली. खानापूर तालुक्यातील करंजे जिल्हा परिषद गटात येणाऱ्या पळशी गावात आमदार सुहास बाबर यांची प्रचारसभा पार पडली. त्यावेळी त्यांनी भाजपावर निशाणा साधला.


"तुझ्या मुख्यमंत्र्याला विचार, सुहास बाबर कोण?"

आमदार सुहास बाबर टीकेला उत्तर देताना म्हणाले, "आधी काय सांगितलं की, सर्वात शेवटी मुख्यमंत्र्यांची असते. अरे तुझा मुख्यमंत्री माझ्यासारखे २४२ (आमदार) आहेत म्हणून मुख्यमंत्री आहे. एकदा जाऊन विचार तुझ्या मुख्यमंत्र्याला कोण आहे सुहास बाबर? त्याचं उत्तर तुला मुख्यमंत्री देतील."

सुहास बाबर यांचे भाजपा नेत्याला आव्हान
"एवढं सोप्पं नाही. राजकारण जेवढं म्हणतात तेवढं सोप्पं नसतं. आज आम्ही २४२ फिरतोय त्याच्या अवतीभोवती. तुझा कोणताही नेता घेऊन जा आणि सुहास बाबर जाऊ दे. नाही मला आत घेतलं आणि तुझ्या नेत्याला बाहेर बसवलं, तर... तुझा तर संबंधच येत नाही", असे आव्हान आमदार बाबर यांनी भाजपाच्या स्थानिक नेत्याला दिले. "खानापूर-आटपाडीची भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना मीच चालवतो. मी दिसतो शांत, पण कार्यक्रम करायला लागलो, तर बघ. विट्यामध्ये मी काय केलं आहे, हे माहिती आहे का", असा इशारा आमदार सुहास बाबर यांनी भाजपा नेत्यांना दिला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.