FDA च्या 'त्या' बड्या अधिकाऱ्याची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांकडे; अधिकाऱ्याची चौकशी करण्याची मागणी; मोठी खळबळ
मुंबई : अन्न आणि औषध विभागातील लाचखोरीचे प्रकरण गाजत आहे. या विभागातील इतर गैरव्यवहारही उघड होत आहेत. यामुळे अन्न आणि औषध प्रशासनातील ढिसाळ कारभार पुन्हा चर्चेत आला आहे. या कारभाराच्या विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना लक्ष घालून कारवाईची विनंती करण्यात आली आहे.
अन्न व औषध विभागातील विभागातील
अधिकारी उल्हास इंगवले यांची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्याकडे देण्यात आली आहे. श्वेता महाले आणि अमोल मिटकरी या दोन्ही
आमदारांनी इंगवले यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर
सभागृहात विभागीय चौकशीचे आश्वासन मिळाल्यानंतर कोणतीही कारवाई केली
नसल्याचे समोर आलं आहे.
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात काय आरोप केला?
दक्षता सह आयुक्तांकडून अधिकारी उल्हास इंगवले यांची चौकशी झाली.परंतु अद्याप अहवाल सादर झालं नसल्याने हे तपासावं. अन्न आणि औषध विभागाचे अधिकारी इंगवले हेच प्रतिबंधित गुटख्याच्या विक्रीत असल्याचा आक्षेप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला. इंगवले यांच्या संपत्तीची आणि कारभाराची चौकशी करण्याची मागणी आमदार श्वेता महाले यांनी केली होती. मात्र, ती मागणी देखील दुर्लक्षित का? असल्याचे पत्रात नमूद करण्यात आलं आहे. इंगवले यांनी मुख्यालय सहआयुक्त (अन्न) हा अतिरिक्त कार्यभार बेकायदेशीरपणे अनेक वर्षे स्वतःच स्वतःकडे घेतला होता, त्याची चौकशी करण्यात व्हावी.इंगवले हे एकाच पदावर इतकी वर्षे कसे, असा सवाल करत त्यांची खातेनिहाय चौकशी करून पदमुक्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. पोलिसांना नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळेत देण्यास प्रतिबंध करण्याचा आदेश यांनी कोणत्या अधिकारात काढला, हे तपासावे, असा सवाल देखील विचारण्यात आला आहे. अशा अधिकाऱ्यांना पदमुक्त केल्यावर विभाग चांगल्या पद्धतीने काम करू शकेल, असे मत तक्रारदार सूरज केराप्पा पडवळकर यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.