Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

फडणवीस सरकारकडून IAS अधिकाऱ्यानंतर 24 तासांच्या आतच सहाय्यक धर्मादाय आयुक्तांचं तडकाफडकी निलंबन,विदर्भ प्रशासनात खळबळ

फडणवीस सरकारकडून IAS अधिकाऱ्यानंतर 24 तासांच्या आतच सहाय्यक धर्मादाय आयुक्तांचं तडकाफडकी निलंबन,विदर्भ प्रशासनात खळबळ
 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारकडून राज्याच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात IAS अधिकाऱ्याचं निलंबनाचे आदेश काढल्यानंतर प्रशासनात मोठी खळबळ उडाली होती. या कारवाईनंतर आणखी एका प्रशासकीय अधिकाऱ्यावर धडक कारवाई करण्यात आली आहे. या प्रकारामुळं विदर्भ प्रशासन हादरलं आहे.

विदर्भातील गोंदिया येथे एका स्थानिक ज्वेलर्सनं लकी ड्रॉचं आयोजन केलं होतं. त्यात एका महिला प्रशिक्षणार्थी सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी सहभाग नोंदवला होता. विशेष म्हणजे या लकी ड्रॉमध्ये संबंधित सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी सहभाग नोंदवत महिंद्रा कंपनीची आलिशान एक्स यूवी 700 ही आलिशान व महागडी गाडी जिंकली.पण जिंकण्याचा आनंद काही क्षणच टिकला. कारण यानंतर आता संबंधित प्रशिक्षणार्थी सहाय्यक धर्मादाय आयुक्तांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. राज्य सरकारच्या विधी आणि न्याय विभागानं या घटनेची गंभीर दखल घेतली. संबंधित घटनेची माहिती मिळताच गोंदिया जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी सहाय्यक धर्मादाय आयुक्त श्रीमती दिशा केशवराव पजई यांच्यावर सरकारच्या विधी आणि न्याय विभागानं निलंबनाची मोठी कारवाई केली आहे. या सरकारच्या धडक कारवाईमुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांचं धाबं दणाणलं आहे. 
गोंदिया जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी सहाय्यक धर्मादाय आयुक्त दिशा केशवराव पजई यांच्यावर राज्य सरकारकडून करण्यात आलेली कारवाई चर्चेचा विषय ठरली आहे. त्यांनी या लकी ड्रॉमध्ये सहभाग घेण्याबाबत परवानगी घेतली नव्हती. त्यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियमांचा भंग केल्याचा ठपका ठेवला आहे. राज्य सरकारकडून प्रशिक्षणार्थी सहाय्यक धर्मादाय आयुक्त दिशा केशवराव पजईही यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीही समोर येत आहे. तसेच त्यांना अनुमती शिवाय गोंदिया मुख्यालय सोडता येणार नसल्याही सरकारच्या विधी व न्याय विभागाच्या आदेशात नमूद केलं आहे.

महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चंद्रपूरच्या आमदारांनं सभागृहात पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना पर्यावरणासंदर्भात एक प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं मुंडे यांना उत्तरच देता आलं नाही, कारण त्याची माहिती आपल्याकडं नसल्याचं त्यांनी सांगितलं. पण हे सांगताना मंत्री पंकजा मुंडेंनी संबंधित आयएएस अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्याबाबत वारंवार सांगितल्याची माहिती सभागृहात दिली. मात्र, त्यांनी हे काम अजूनही केलेलं नसून वारंवार बोलवून देखील ते यासंदर्भात माहिती देण्यास उपस्थित राहिले नसल्याचा आरोपही मुंडेंनी म्हटलं होतं.
पंकजा मुंडेंच्या या उत्तरानंतर तालिका अध्यक्ष दिलीप लांडे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित अधिकारी प्रदुषण नियंत्रण मंडळातील सदस्य, सचिव असलेले IAS अधिकारी एम देवेंद्र सिंग यांच्या निलंबनाचे आदेश दिले. या आदेशानंतर पर्यावरण विभागानं IAS सिंग यांना निलंबीत करण्याची प्रक्रिया सुरु करुन याची फाईल मुख्यमंत्र्याकडं पाठवून दिली. त्याचबरोबर सहसंचालक IAS सतीश पडवळ यांना देखील निलंबीत करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यांपैकी एम. देवेंद्र सिंग यांच्या निलंबनाच्या फाईलवर मुख्यमंत्र्यांनी सही केल्यानं आता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.