जर तुम्ही शिक्षण क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. नॅशनल काउंसिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग म्हणजेच NCERT ने भरती जाहीर जाहीर केली आहे. प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे चांगल्या ठिकाणी नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. एनसीईआरटीमध्ये मॅथ्स, आर्ट एज्युकेशन, इकोनॉमिक्स, हिंदी, इतिहास, पॉलिटिकल सायन्स, इंग्रजी, उर्दू अशा विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्ही ३१ जानेवारी २०२६ पासून अर्ज करु शकतात. तुम्हाला ncert.nic.in वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.
या पदांसाठी भरती
एनसीईआरटीमध्ये मॅथ्स, आर्ट एज्युकेशन, बायो सायन्य, ज्यूलॉजी, एज्युकेशन, सायन्स, सायकोलॉजी, पॉप्युलेशन स्टडीज, इंग्रजी, उर्दू, सोशिओलॉजी, होम सायन्स, कॉम्प्युटर एज्युकेशन अशा विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात येणार आहे.११७ पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. एनसीइआरटीची ही भरती ३१ जानेवारीपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० फेब्रुवारी २०२६ निश्चित करण्यात आली आहे.
पगार
प्रोफेसर
पदासाठी उमेदवारांना १,४४,२०० रुपये पगार मिळणार आहे. असोसिएट प्रोफेसर
पदासाठी १,३१,४०० रुपये पगार मिळणार आहे. असिस्टंट प्रोफेसर पदासाठी ५७,७००
रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही.
शॉर्टलिस्टिंग आणि इंटरव्ह्यूद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
पात्रता
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित क्षेत्रात पीएचडी केलेली असावी. याचसोबत १० वर्षांचा प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर किंवा असोसिएट प्रोफेसर म्हणून काम करण्याचा अनुभव असायला हवा.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.