Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दादांचा विलिनीकरणाबाबत एक सोडून सर्व आमदारांवर विश्वास; NCP च्या बड्या नेत्याचा दावा

दादांचा विलिनीकरणाबाबत एक सोडून सर्व आमदारांवर विश्वास; NCP च्या बड्या नेत्याचा दावा
 

राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवारांची निवड झाली आहे. तर, दुसरीकडे राष्ट्रवादी पक्षाच्या विलीनकरणाची चर्चा देखील सुरु आहेत. राष्ट्रवादी पक्षाच्या विलीनकरणाबाबत दोन्ही राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांमध्ये एकमत दिसून आलेले नाही. अशातच राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याने मोठा दावा केला आहे. एक आमदार सोडून सर्व आमदार अजित पवार सांगतील तिथे सह्या करणार होते असा दावा या नेत्याने केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरण बाबत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या दोन्ही नेत्यांनी माहिती होती.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरण बाबत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या दोन्ही नेत्यांनी माहिती होती असा दावा या बड्या नेत्याने केला आहे. दिवंगत नेते अजित पवार यांनी पक्षातील प्रमुख नेत्यांना विलीनीकरणाबाबत होत असलेल्या बैठकींची माहिती देत होते असे देखील या नेत्याने सांगितले. हे सर्व दावे करणारा नेता हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातील मोठा नेता आहे. 
 
शरद पवारांच्या पक्षातील या बड्या नेत्याने पटेल आणि तटकरे यांचं याबाबत मत विचारले असता दादांनी त्या नेत्याला उत्तर देताना सर्वांना सर्व माहिती आहे, माझ्या पक्षाकडून मी सांगेल ते होईल असा शब्दही दिला होता. दिल्लीतून एकदा का हिरवा कंदील आला की माझ्या पक्षातील एक आमदार सोडून सर्व मी सांगेल तिथे सह्या करतील, असंही दादांनी त्या बैठकीत सांगितल्याची सूत्रांची माहिती आहे.
अजित पवारांनी अविश्वास दाखवला तो एक आमदार कोण?

दरम्यान अजित पवारांनी अविश्वास दाखवला तो एक आमदार कोण अशी चर्चा रंगली आहे. छगन भुजबळ, धनंजय मुंडे, अदिती तटकरे यांची नावे घेतली जात आहेत. मात्र, नक्की हा आमदार कोण याबाबत कोणतेही नाव समोर आलेले नाही.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.