फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी मंगळवारी दक्षिण मुंबईत विशेष वाहतूक निर्बंध लागू केले आहेत. या उच्चस्तरीय भेटीमुळे गेटवे परिसरात
कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार असून, नागरिकांच्या
सुरक्षिततेसाठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. पश्चिम द्रुतगती महामार्ग
अवजड वाहनांसाठी १३ तास बंद ठेवण्यात येणार आहे. दक्षिण मुंबईतील
महत्त्वाचे रस्ते बंद असणार आहेत. याबाबत मुंबई वाहतूक पोलिसांनी
सोमवारीपरिपत्रक जारी केले आहे.
गेटवे ऑफ इंडिया येथे 'इंडिया फ्रान्स इयर ऑफ इनोव्हेशन' या मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम फ्रान्सच्या वाणिज्य दूतावासातर्फे १४ ते २२ फेब्रुवारीदरम्यान आयोजित उपक्रमाचा भाग आहे. तसेच, राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या भेटीदरम्यान ताज महाल पॅलेस येथे 'इंडिया-फ्रान्स इनोव्हेशन फोरम' होणार आहे. यासाठी वाहतूक कोंडी होऊ नये, म्हणून वाहतूक पोलिसांनी परिपत्रक जारी केले आहे. मंगळवारी (ता. १७) सकाळी ८ ते रात्री ९ या वेळेत वाकोला उड्डाणपूल ते दहिसर टोलनाक्यापर्यंत अवजड वाहनांना प्रवेश मिळणार नाही. दोन्ही बाजूंकडील वाहतूक सामान्य वाहनांसाठी सुरू असली, तरी सुरक्षेमुळे काही ठिकाणी वेग मंदावण्याची शक्यता आहे. या बंदीतून रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्या, पोलिस आणि सुरक्षा व्यवस्थेतील सरकारी वाहने, अत्यावश्यक सेवेसाठी परवानगी घेतलेली वाहने यांना सूट असेल. दरम्यान, नागरिकांनी वाहतूक बदलांची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करावे आणि वाहतूक पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज मार्ग
श्यामप्रसाद
मुखर्जी चौकापासून (रिगल जंक्शन) गेटवे ऑफ इंडिया ते अॅडम स्ट्रीटपुढे पी.
रामचंदानी मार्ग त्यापुढे जोकिम अल्वा चौक (नॉर्थ कोर्ट) सर्वसामान्य
वाहनांसाठी बंद असेल. पर्यायी मार्ग म्हणून रिगल जंक्शनकडून पुढे
जाण्यासाठी शहीद भगतसिंग मार्ग, महाकवी भूषण मार्गावरून उजवे वळण घेऊन बी.
के. बोमण बेहराम मार्गपुढे वाहनचालकांना जाता येईल. दुसरीकडे रिगल
जंक्शनकडून पुढे एस.बी. एस. रोड, इलेक्ट्रिक हाउस जंक्शन, बेस्ट मार्ग,
अल्वा चौक, उजवे वळण, पी. रामचंदानी मार्ग, रेडिओ क्लब, असा मार्ग
वाहनचालकांना उपलब्ध असेल.
पी. रामचंदानी मार्ग
जोकिम अल्वा चौकापासून अॅडम स्ट्रीटच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना प्रतिबंध असेल. पुढे रेडिओ क्लबकडून पी. रामचंदानी मार्ग, अल्वा चौकातून डावे वळण घेऊन बेस्ट मार्ग पुढे इच्छित स्थळ जाता येईल. यामध्ये अॅडम स्ट्रीट आणि पी. रामचंदानी मार्गावरील बेस्ट बस थांबे व टॅक्सी स्टँड तात्पुरते बंद राहतील.नाथालाल पारेख मार्गजगन्नाथ भोसले मार्गकॅप्टन प्रकाश पेठे मार्गरामभाऊ साळगांवकर मार्गशहीद भगतसिंग मार्गबी. के. बोमण बेहराम मार्ग (ताज हॉटेलमागील भाग ते हॉटेल डिप्लोमॅटपर्यंत)
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.