Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पगार हवा की बाळ. कंपनीने 'वर्क फॉर्म होम' नाकारल्यानं नवजात अर्भकाचा मृत्यू; पीडितेला 189 कोटींची भरपाई देण्याचे आदेश

पगार हवा की बाळ. कंपनीने 'वर्क फॉर्म होम' नाकारल्यानं नवजात अर्भकाचा मृत्यू; पीडितेला 189 कोटींची भरपाई देण्याचे आदेश


गर्भवती कर्मचाऱ्याला 'वर्क ऑफ होम' नाकारून कार्यालयात बोलावणे एका कंपनीला चांगलेच महागात पडले आहे. कामावर असताना महिलेची प्रसूती झाली आणि अवघ्या दीड तासांमध्ये तिच्या नवजात अर्भकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी न्यायालयाने संबंधित कंपनीला 22.5 दशलक्ष डॉलर्स (जवळपास 189 कोटी रुपये) भरपाई देण्याचे आदेश दिले आहे. अमेरिकेतली ओहायो येथील ही घटना आहे.
हिंदुस्थान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, चेल्सी वॉल्श असे पीडित महिलेचे नाव आहे. ती टोटल क्वालिटी लॉजिस्टिक या कंपनीमध्ये कामाला होती. 2021 मध्ये चेल्सी गर्भवती असताना तिला काही वैद्यकीय गुंतागुंतीचा सामना करावा लागला होता. तिच्या डॉक्टरांनी तिला पूर्ण विश्रांती घेण्याचा आणि घरातूनच काम करण्याचा स्पष्ट सल्ला दिला होता.

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चेल्सीने 15 फेब्रुवारी 2021 रोजी घरून काम करण्याची परवानगी मागितली. मात्र कंपनीने तिची विनंती फेटाळून लावली आणि तिला दोनच पर्याय दिले. एकतर ऑफिसला येऊन काम करा किंवा पगार आणि आरोग्य विमा सोडून बिनपगारी रजेवर जा. शेवटी आर्थिक विवंचनेमुळे डॉक्टरांच्या सल्ल्याविरुद्ध जाऊन चेल्सी फेब्रुवारीपासून ऑफिसला येऊ लागली.
ऑफिसमध्ये तीन दिवस काम केल्यानंतर 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी चेल्सीला प्रसूती वेदना सुरू झाल्या. तिने एका मुलीला जन्म दिला. मात्र वेळेआधीच जन्माला आलेल्या अर्भकाचा दीड तासातच मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे प्रसूती वेदना सुरू होण्याच्या काही तास आधीच कंपनीने तिचा ‘वर्क फ्रॉम होम’चा अर्ज मंजूर केला होता. परंतु तो पर्यंत खूप उशिर झाला होता.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.