एकनाथ शिंदेंच्या मंत्र्याला भाजपच्या 3 आमदारांनी घेरलं, गुणवत्ता, भ्रष्टाचार सर्वच काढलं...
एकनाथ शिंदेंची शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अशा महायुतीचं सरकार सध्या सत्तेत आहे. पण या महायुतीत सारं काही आलबेल नाही, अशी चर्चा आहे. विधानसभेत असं चित्र दिसून आलं एकनाथ शिंदेंच्या मंत्र्याला भाजपचे 3 आमदार घेरताना दिसले.
त्यामुळ शिंदेंच्या मंत्र्याची चांगलीच गोची झाली. काय घडलं नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं नेमकं?
राज्याचं शिक्षण खातं शिवसेनेच्या दादा भुसेंकडे आहे. त्यांनी शालेय शिक्षण विभागात अनेक निर्णय घेतले. यावर विधानसभेत चर्चा झाली. भाजप आमदारांकडून शिक्षण विभागाशी संबंधित अनेक प्रश्न दादा भुसेंना विचारण्यात आले. यावर दादा भुसेंनी उत्तरही दिले. पण यातून भाजप आमदारांचे समाधान झाले नाही.
दादा भुसेंना घेरलं
भाजपा आमदार अभिमन्यू पवार दादा भुसेंनी दिलेल्या लेखी उत्तरावर भाजपा आमदार नाराज अभिमन्यू पवार नाराज दिसले. शाळेबाबत दादा भुसे यांनी उत्तर दिले आहे ते समाधनकारक नाही, असे ते म्हणाले. शाळेला डिजिटल बोर्ड लावले म्हणून शाळा डिजिटल होत नाही. महाराष्ट्रातील प्राथमिक शाळेची अवस्था अत्यंत वाईट आहे. प्राथमिक शिक्षण अत्यंत महत्वाचं असल्याचं अभिमन्यू पवार म्हणाले. जागतिक वित्तीय संस्थेकडून निधी का आणत नाही?,आजही शिक्षकांची संख्या नाही. शिक्षण व्यवस्थेत आपण पैसै घालणार का? असा प्रश्न त्यांनी विचारला. यावर दादा भुसेंकडून त्यांना उत्तर देण्यात आले. गुणवत्तापूर्ण शिक्षण कसे देता येईल यासाठी आराखडा तयार केला आहे. यापुढे तुम्हाला फिल्डवर प्रतिबिंब पाहायला मिळेल, असे उत्तर देण्यात आले.
काय म्हणाले अमित साटम?
शाळांमध्ये सीसीटीव्ही आपण सीएसआर फंडाच्या माध्यमातून करत आहोत. आपल्या विभागाचा फंड नाहीये का? असा प्रश्न अमित साटम यांनी उपस्थित केला. भ्रष्टाचार कमी करण्यासाठी शासकीय जेएम पोर्टलवरुन खरेदी का करत नाही? असा प्रश्नही विचारला.
'माझ्या प्रश्नाचं उत्तर मंत्री देत नाहीयत'
यानंतर अभिमन्यू पवार यांनी हस्तक्षेप करत आपले मुद्दे मांडले. माझ्या प्रश्नाचं मुळ उत्तर मंत्री महोदय देत नाहीत. शिक्षण विभाग कर्ज का घेत नाही?, महाराष्ट्र सुजलाम सुफलाम का करत नाही? असा प्रश्न त्यांनी विचारला.
यावर उत्तर देताना पवित्र पोर्टलद्वारे काम केल जात आहे. अभ्यासक्रमात आपण बदल करत आहोत. वर्षभरात यात बदल घडून येईल, असे दादा भुसे म्हणाले.
काय म्हणाले संजय केळकर?
दादा भुसे यांनी जी आकडेवारी दिलेली आहे ती अत्यंत वाईट आहे. दारुण परिस्थिती या शाळांची आहे. शिक्षकांची इतर कामे बंद केली पाहिजेत. महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे आणि ही आकडेवारी गंभीर आहे.शिक्षकाची इतर काम बंद करणार का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावर उत्तर देताना शिक्षकांची इतर कामे टप्याटप्यात कमी करत आहे. महिन्याच्या शेवटच्या शनिवारी माहिती देता येईल का? यावर ही विचार सुरु असल्याचे दादा भुसे म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.