Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आता रात्रभर चालणार बार; 5-स्टार हॉटेलबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या नवे नियम

आता रात्रभर चालणार बार; 5-स्टार हॉटेलबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या नवे नियम




बार आणि रेस्टॉरंट्समधील दारू विक्रीसाठी राज्य सरकार नवीन नियमावली तयार करणार आहे. या नव्या नियमानुसार पंचतारांकित हॉटेलमध्ये पहाटे चार वाजेपर्यंत दारू मिळणार आहे. झारखंड एक्साईज हॉटेल, रेस्टॉरंट, बार आणि क्लब (परवाना आणि ऑपरेशन) नियम २०२६ लवकरच सुधारणांसह मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी पाठवले जाणार आहे.

झारखंड उत्पादन शुल्क विभाग बार नियम २०२६ वर प्राप्त झालेल्या आक्षेपांचा आढावा घेतला जातोय. दरम्यान नियमांचा आणि आक्षेपाचा रिव्ह्यू घेतल्यानंतर सुधारित नियम लवकरच मंत्रिमंडळाकडे मंजुरीसाठी पाठवले जाणार आहेत. घेण्यात आलेले आक्षेप आणि नियमांचा आढावा घेतल्यानंतर ते १ एप्रिल रोजीपासून लागू होण्याची अपेक्षा आहे.

१ एप्रिलपासून राज्यातील बार, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि क्लब या नियमावली अंतर्गत सुरू होतील. त्याआधी मंत्रिमंडळाच्या मंजुरीसह सर्व प्रक्रियांचे पालन केले जाईल. ७ फेब्रुवारी शनिवारी उत्पादन शुल्क आणि दारूबंदी विभागाने सामान्य जनता, हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट चालकांसाठी या नवीन नियमनाचा मसुदा जारी केला होता.

त्यानंतर नियमांवर हरकती मागवण्यात आल्या होत्या. या नियमनाबद्दल बार ऑपरेटर आणि इतर व्यवसायांकडूनही आक्षेप घेण्यात आले होते, त्या सर्व आक्षेपांचा आता आढावा घेतला जातोय. आक्षेपांचा आढावा घेतल्यानंतर, सुधारित नियम लवकरच मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी पाठवले जातील.

नवीन नियम काय आहेत?
राज्यातील बार, रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि क्लबसाठीच्या नियमांनुसार, पंचतारांकित हॉटेल्सना पहाटे ४ वाजेपर्यंत दारू देण्याची परवानगी मिळेल. वेगवेगळ्या जिल्ह्यांनी बार ऑपरेशन्ससाठी वेगवेगळे वेळा, वेगवेगळे शुल्क इत्यादी निश्चित केले आहेत. उत्पादन शुल्क विभागाने प्रस्तावित नियमांच्या मसुद्यावर आक्षेप नोंदवण्याची शेवटची संधी २० फेब्रुवारीपर्यंत दिली होती. सुरक्षा ठेवी आणि परवाना शुल्कात वाढ करण्यास व्यवसायांनी आक्षेप घेतला आहे. प्रस्तावित नियमांमध्ये व्हॅटचा समावेश करणे अन्याय्य असल्याचे असोसिएशनने म्हटलंय.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.