Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वन विभागाच्या अधिकाऱ्याला ४ लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले:,पुणे ACB चा मोठा झटका!

वन विभागाच्या अधिकाऱ्याला ४ लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले:,पुणे ACB चा मोठा झटका!


पुण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत वन विभागातील एका अधिकाऱ्याला 4 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे. ही कारवाई आज (दि. 29 मार्च) दुपारी आरणेश्वर चौक परिसरात करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव उदयसिंग भिमराव कुंभार (46) असे असून ते उपवनसंरक्षक कार्यालय, सेनापती बापट रोड येथे वनक्षेत्र सर्वेक्षक म्हणून कार्यरत आहेत.
तक्रारदार हे जमीन खरेदी-विक्री व्यवसाय करतात. वडगाव मावळ तालुक्यातील काही जमिनींच्या 7/12 उताऱ्यावर असलेले खाजगी वनाचे शेरे काढून टाकण्यासंदर्भात महसूल विभागाने 'रिस्टोर्ड ऑर्डर्स' दिल्या होत्या. या 11 ऑर्डर्सच्या प्रती मिळवण्यासाठी तक्रारदाराने वन विभागाकडे अर्ज केला होता. मात्र, या ऑर्डर्स देण्यासाठी आरोपी कुंभार यांनी सुरुवातीला 7 लाख रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने ACB कडे तक्रार दिल्यानंतर पडताळणी करण्यात आली. यावेळी तडजोडीअंती 4 लाख रुपयांवर व्यवहार ठरल्याचे स्पष्ट झाले.
आज आरणेश्वर चौक परिसरात, पुना प्रिव्हेंटिव्ह कार्डियोलॉजी सेंटर आणि वाय के वडेवाले हॉटेल समोर, आरोपी कुंभार यांनी तक्रारदाराकडून 4 लाख रुपये रोख स्वीकारले. याच वेळी ACB च्या पथकाने सापळा रचून त्यांना रंगेहात पकडले. या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 अंतर्गत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. तपास पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे करत आहेत.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.