Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Big Breaking! भारतावर गॅस, पेट्रोल, डिझेल तुटवड्यापेक्षा महाभयानक संकट; RBI चे प्रयत्नही अपयशी ठरले, आता सरकारही काही करु शकत नाही? अर्थव्यवस्था धोक्यात?

Big Breaking! भारतावर गॅस, पेट्रोल, डिझेल तुटवड्यापेक्षा महाभयानक संकट; RBI चे प्रयत्नही अपयशी ठरले, आता सरकारही काही करु शकत नाही? अर्थव्यवस्था धोक्यात?


अमेरिका इस्रायल इराण युद्धामुळे जगात तणाव निर्माण झाला आहे. संपूर्ण जग उर्जा संकटाच्या छायेत आहे. भारतालाही याचा फटका बसला आहे. भारतावर गॅस, पेट्रोल, डिझेल तुटवड्यापेक्षा महाभयानक संकट आले आहे. RBI चे प्रयत्नही अपयशी ठरले, आता सरकारही काही करु शकत नाही. या नव्या संकटामुळे भारताची अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. रुपयाची 'ऐतिहासिक' घसरण झाली आहे. डॉलरच्या तुलनेत प्रथमच रुपयाने 95 चा स्तर ओलांडला आहे. ज्यामुळे चलन बाजारात मोठी उलथापालथ झाली आहे.

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठा धमाका पहायला मिळाला. शेअर बाजारात जबरदस्त घसरण झाली. आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (FIIs) सुरू असलेल्या विक्रीच्या पार्श्वभूमीवर व्यवहारादरम्यान रुपयाने डॉलरच्या तुलनेत प्रथमच 95 चा टप्पा ओलांडला. भारतीय चलनाने अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 95.14 चा विक्रमी नीच्चांक गाठला. रुपया आशियातील सर्वात खराब कामगिरी करणारे चलन ठरले आहे. 1 जानेवारी 2026 पासून अमेरिकन डॉलरच्या (USD) तुलनेत त्यात 4.1टक्के ची घसरण झाली आहे. तत्पूर्वी, भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) सट्टेबाजीच्या हालचालींवर निर्बंध लादल्यानंतर रुपया डॉलरच्या तुलनेत 130 पैशांनी वधारला होता. गेल्या काही आठवड्यांत वारंवार नवीन नीचांक गाठणाऱ्या चलनाचे स्थिरीकरण करण्यासाठी आरबीआयने डॉलरमधील देशांतर्गत लाँग पोझिशन्स मर्यादित केल्या होत्या. RBI चे प्रयत्नही अपयशी ठरल्याचे दिसत आहे.

डॉलरच्या तुलनेत रुपयाची मोठी पडझड

सुरुवातीच्या व्यवहारात स्थानिक चलन डॉलरच्या तुलनेत 93.59 वर व्यवहार करत होते, जे 27 मार्च रोजी नोंदवलेल्या 94.85 च्या विक्रमी नीचांकी पातळीपेक्षा 1.3 टक्क्यांनी अधिक होते. शेअर बाजारात, सेन्सेक्स 1,600 अंकांनी घसरून 71,985 अंकांवर बंद झाला, तर निफ्टी 478 अंकांनी घसरून 22,341 अंकांवर बंद झाला. एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी शुक्रवारी निव्वळ आधारावर 4,085 कोटींच्या शेअर्सची विक्री केली.

रुपयाची पडझड पाहता ही स्थिती भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी धोक्याची घंटा ठरु शकते अशी चिंता तज्ञांनी व्यक्त केली आहे.आरबीआयच्या निर्देशामुळे फ्युचर्स मार्केटमधील अतिरिक्त सट्टेबाजीला आळा बसेल, पण चलनाची कमजोरी थांबवण्यासाठी ते पुरेसे ठरणार नाही. कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती आणि बाजारात एफपीआयंकडून (FPIs) होणाऱ्या सततच्या विक्रीमुळे वाढलेला व्यापार आणि चालू खात्यातील तूट (CAD) यामुळे ही कमजोरी निर्माण झाली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) बँकांच्या परकीय चलन स्थितीवर कडक निर्बंध घातल्यानंतर अस्थिरतेची ही नवीन फेरी सुरू झाली आहे. या निर्देशामुळे बँकांना नॉन-डिलिव्हरेबल फॉरवर्ड (एनडीएफ) बाजारात पोझिशन्स तयार करून देशांतर्गत डॉलर होल्डिंग्जची विक्री करण्यास भाग पडले, ज्यामुळे देशांतर्गत आणि परदेशी दरांमध्ये तफावत निर्माण झाली आहे.

रुपयाच्या या ऐतिहासिक घसरणीचे सर्वात मोठे कारण
रुपयाच्या या ऐतिहासिक घसरणीचे सर्वात मोठे कारण आहे कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ. इराणने आखाती देशांमधील ऊर्जा प्रकल्पांवर केलेल्या हल्ल्यांनंतर, ब्रेंट क्रूडच्या किमती प्रति बॅरल 110 डॉलरच्या वर गेल्या. भारत आपल्या तेलाच्या गरजेपैकी 85 टक्के तेल आयात करतो, ज्यासाठी आपण डॉलरमध्ये पैसे देतो. वाढत्या तेलाच्या किमतींमुळे डॉलरची मागणी वाढली, ज्यामुळे रुपया कमकुवत झाला.
विदेशी गुंतवणूकदारांची (FIIs) माघार

परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी मार्च महिन्यात आतापर्यंत भारतीय शेअर बाजारातून अंदाजे 12.3. अब्ज डॉलर्स (सुमारे 1.15 लाख कोटी रुपये) काढून घेतले आहेत. जागतिक अनिश्चितता आणि युद्धाच्या भीतीमुळे परदेशी गुंतवणूकदारांनी भारतासारख्या मोठ्या बाजारपेठांमधून आपला निधी काढून घेऊन तो अमेरिकी बॉण्ड्ससारख्या सुरक्षित गुंतवणुकीच्या ठिकाणी गुंतवला आहे. या मोठ्या विक्रीमुळे रुपयावर लक्षणीय दबाव आला आहे.

होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तणावाचा रुपयाशी काय संबंध?
होर्मुझची सामुद्रधुनी हा असा सागरी मार्ग आहे, ज्यातून जगातील 20 टक्क तेल आणि भारताचे जवळपास निम्मे तेल जाते. इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या तणावामुळे या मार्गावरील पुरवठ्यात व्यत्यय येण्याची भीती निर्माण झाली आहे. बाजार तज्ज्ञांच्या मते, जोपर्यंत या सागरी मार्गावरील परिस्थिती अधिक स्पष्ट होत नाही, तोपर्यंत रुपयामध्ये चढ-उतार होत राहतील.
रुपयाची घसरण थांबवण्यासाठी रिझर्व्ह बँकेचे प्रयत्न

आरबीआय परकीय चलन बाजारात सातत्याने हस्तक्षेप करत असते. बँक आपल्या परकीय चलन साठ्यातून डॉलर विकून रुपयाची घसरण रोखण्याचा प्रयत्न करत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) सट्टेबाजीच्या हालचालींवर निर्बंध लादले आहेत.

देशाच्या जीडीपी वाढीवरही काय परिणाम होणार?
रुपयाच्या पडझडीचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. अर्थतज्ज्ञांनी गंभीर इशारा दिला आहे. वाढत्या ऊर्जा किमतींमुळे भारताचा विकास दर मंदावू शकतो. ऊर्जा किमतींमध्ये सतत होणारी वाढ यामुळे महागाई वाढी शकते. भारताच्या विकासाला बाधा आणू शकते. त्यामुळे व्याजदरात कपात करणेही कठीण होईल.
रुपया कमकुवत झाल्याचा सर्वसामान्य माणसाच्या खिशावर काय परिणाम होईल?

रुपया कमकुवत झाल्यामुळे भारतासाठी आयात महाग होईल. आपल्याला कच्चे तेल यांसारख्या वस्तूंसाठी जास्त पैसे मोजावे लागतील. शिवाय, परदेशातून आयात होणाऱ्या मोबाईल फोन आणि लॅपटॉपसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूही महाग होतील. परदेशात शिक्षण घेणेही महाग होईल.

रुपयाच्या घसरणीमुळे कोणाला फायदा होणार?
रुपया कमकुवत झाल्याने निर्यातदारांना फायदा होणार आहे. आयटी क्षेत्र, औषधनिर्माण आणि वस्त्रोद्योग क्षेत्रातील कंपन्यांना त्यांच्या सेवा किंवा उत्पादनांसाठी डॉलर्समध्ये पैसे मिळतात. जेव्हा त्या डॉलर्सचे रुपयांमध्ये रूपांतर करतात, तेव्हा त्यांना पूर्वीपेक्षा जास्त रुपये मिळतात.
रुपयाची घसरण थांबेल का आणखी वाढेल?

तज्ज्ञांच्या मते, जोपर्यंत कच्च्या तेलाच्या किमती 110-115डॉलरच्या वर राहतील आणि परदेशी गुंतवणूकदार विक्री करत राहतील, तोपर्यंत रुपया कमजोर राहील. जर जागतिक भावना सुधारली नाही, तर रुपया 98 पर्यंतही पोहोचू शकतो.

चलनाची किंमत कशी ठरवली जाते?
कोणत्याही देशाच्या चलनाचे मूल्य प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी आणि पुरवठ्यावर अवलंबून असते. जर भारताने कच्च्या तेलासारख्या अधिक वस्तू आयात केल्या, तर पैसे देण्यासाठी त्याला अधिक डॉलर्सची आवश्यकता असेल. जसजशी डॉलर्सची मागणी वाढेल, तसतसे ते महाग होईल, ज्यामुळे रुपयाचे अवमूल्यन होईल.

याव्यतिरिक्त, एखाद्या देशाचा चलनवाढीचा दर, व्याजदर आणि परदेशी गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास या गोष्टीदेखील चलनाचे मूल्य ठरवतात. जर भारताचे व्याजदर चांगले असतील आणि अर्थव्यवस्था स्थिर असेल, तर परदेशी गुंतवणूकदार डॉलर आणतील, ज्यामुळे डॉलरचा पुरवठा वाढेल आणि रुपया मजबूत होईल. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, ज्या चलनाला जागतिक मागणी जास्त असते आणि उपलब्धता कमी असते, ते अधिक मौल्यवान ठरते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.