मुंबई : नाशिक ग्रामीण पोलिसांनी दोन दिवसांपूर्वीच भोंदू बाबा अशोक खरात याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली आहे. धार्मिक आस्था, दैवी शक्ती आणि मंत्रतंत्राच्या आडून महिलांचा विश्वास संपादन करून त्यांच्यावर अत्याचार केल्याचा आरोप अशोक खरात याच्यावर आहे. मात्र आरोप अशोक खरात याचे राजकीय नेत्यांसोबत फोटो समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांच्यासोबत भोंदू बाबा अशोक खरात याचा फोटो समोर आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अशोक खरात. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी माजी मंत्री दिपक केसरकर यांच्यासोबत अशोक खरात याची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा सुद्धा अशोक खरातसोबतचा फोटो समोर आला आहे.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकात पाटील यांचा सुद्धा अशोक खरातसोबतचा फोटो समोर आला आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर या एका कार्यक्रमात अशोक खरात याच्यासोबत दिसत आहेत. माजी मंत्री तथा अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांचा सुद्धा अशोक खरातसोबतचा फोटो समोर आला आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा खासदार श्रीकांत शिंदे यांनी सुद्धा अशोक खरात यांची भेट घेतल्याचा फोटो समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष, ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यासोबतही अशोक खरातचा फोटो आला समोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधान परिषद आमदार मिलिंद नार्वेकरांसोबत भोंदू अशोक खरात.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.