Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Big Breaking! युद्धाचा परिणाम इंटरनेटवरही! भारतात नेट बंद होण्याची शक्यता; तज्ज्ञ काय सांगतात?

Big Breaking! युद्धाचा परिणाम इंटरनेटवरही! भारतात नेट बंद होण्याची शक्यता; तज्ज्ञ काय सांगतात?



आखाती देशांमधील वाढत्या युद्ध तणावाचा परिणाम आता डिजिटल जगावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. होर्मुझ सामुद्रधुनी ही केवळ तेल वाहतुकीसाठीच नव्हे, तर जागतिक इंटरनेट वाहतुकीसाठीही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या सागरी मार्गाच्या तळाशी जगातील अनेक देशांना जोडणाऱ्या फायबर ऑप्टिक केबल्सचे जाळे आहे. या केबल्समधूनच मोठ्या प्रमाणात इंटरनेट डेटा वहन केला जाते. या केबल्सची दुरुस्ती किंवा मेंटेनन्स नाही केलं तर याचा फटका भारतातील इंटरनेट सेवेवर पडू शकतो अस सांगितले जात आहे.

जगातील बहुतांश इंटरनेट सेवा या समुद्राखाली टाकलेल्या फायबर ऑप्टिक केबल्सवर अवलंबून आहेत. भारताची आंतरराष्ट्रीय इंटरनेट कनेक्टिव्हिटीही मोठ्या प्रमाणात अरबी समुद्रातून आखाती देश आणि युरोपकडे जाणाऱ्या केबल्सवर आधारित आहे. यापैकी अनेक केबल्स होर्मुझ सामुद्रधुनीच्या परिसरातून जातात.


इंटरनेट तज्ज्ञांच्या मते, या परिसरात युद्ध चिघळल्यास किंवा केबल्सचे नुकसान झाल्यास भारतासह अनेक देशांतील इंटरनेट सेवा बाधित होऊ शकतात. भारतातून पश्चिमेकडे जाणाऱ्या इंटरनेट ट्रॅफिकपैकी सुमारे एक तृतीयांश डेटा याच मार्गातून जात असल्याचेही सांगितले जाते त्यामुळे भारतातील बँका, डिजिटल प्लॅटफॉर्म, सोशल मीडिया आणि काही प्रमाणात सॅटॅलाइट यंत्रणेवर मोठा परिणाम होऊ शकतो.

याबाबत बोलताना इंटरनेट एक्सपर्ट मायाश्री गायकवाड म्हणल्या, "जागतिक इंटरनेट नेटवर्कमध्ये समुद्राखालील फायबर ऑप्टिक केबल्सचा मोठा वाटा आहे. होर्मुझ सामुद्रधुनी हा अत्यंत संवेदनशील मार्ग असल्याने येथे कोणताही संघर्ष किंवा नुकसान झाल्यास डेटा ट्रॅफिकवर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे इंटरनेटची गती कमी होणे किंवा काही काळ सेवा खंडित होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

एकूणच, होर्मुझ सामुद्रधुनीतील तणाव वाढल्यास त्याचा परिणाम केवळ तेल पुरवठ्यावरच नव्हे तर इंटरनेटसारख्या अत्यावश्यक डिजिटल सेवांवरही होऊ शकतो. त्यामुळे या क्षेत्रातील परिस्थितीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.