Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Big News! भोंदूबाबा अशोक खरातच्या HIV टेस्टचा रिपोर्ट समोर

Big News! भोंदूबाबा अशोक खरातच्या HIV टेस्टचा रिपोर्ट समोर

महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून न्यायालयाने अशोक खरातला २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या या प्रकरणाची एसआयटी (SIT) कडून कसून चौकशी सुरू आहे. आता याच दरम्यान अशोक खरातच्या काही वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या होत्या. यातील HIV चाचणीचा रिपोर्ट समोर आला आहे.

अशोक खरात हा सध्या पोलीस कोठडी आहे. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्या आहेत. अशोक खरातने मोठ्या संख्येने महिलांचे लैंगिक शोषण केल्यामुळे पीडित महिलांच्या आरोग्याचा आणि सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय आणि तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी HIV टेस्ट केली होती, ज्याचा रिपोर्ट आता समोर आला आहे. अशोक खरातची HIV चाचणी निगेटिव्ह आली आहे.

पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अशोक खरातने आतापर्यंत १५० हून अधिक महिलांवर अत्याचार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. भविष्य सांगणे आणि कौटुंबिक समस्या दूर करण्याच्या नावाखाली तो महिलांना जाळ्यात ओढत असे. खरातने मोठ्या संख्येने महिलांचे लैंगिक शोषण केल्यामुळे पीडित महिलांच्या आरोग्याचा आणि सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय आणि तांत्रिक पुरावा म्हणून पोलिसांनी त्याची HIV टेस्ट केली होती.

या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून न्यायालयाने अशोक खरातला २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या तो पोलीस कोठडीत असून एसआयटी (SIT) कडून त्याची कसून चौकशी सुरू आहे. अशोक खरात हा महिलांना संमोहित करून किंवा भीती घालून त्यांचे शोषण करत असे. हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याने पोलीस गुन्ह्याशी संबंधित सर्व बाजूंचा बारकाईने विचार करून तपास करत आहेत. सध्या एसआयटी या प्रकरणातील इतर धागेदोरे शोधत असून, अजून किती महिला या जाळ्यात अडकल्या आहेत याचा शोध घेतला जात आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.