Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Big News!अशोक खरात प्रकरणी पहिली मोठी कारवाई! अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना दणका, आदेश जारी

Big News!अशोक खरात प्रकरणी पहिली मोठी कारवाई! अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना दणका, आदेश जारी


नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी आता संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारला जात आहे. शासनाने अभिजित भांडे यांची प्रतिनियुक्ती काढून घेतली आहे. अशोक खरातसोबत पत्नीने केलेली गुंतवणूक त्याला भोवली आहे.
अभिजित भांडे पाटील यांच्याकडे झोपडपट्टी पुनर्वसन विभागातील प्रतिनुयुक्ती पद होतं. आता त्यांना महसूल व वन विभागात रुजू होण्यास सांगण्यात आलं आहे. उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे पाटील यांच्या पत्नीची अशोक खरातच्या मुलीबरोबर जमिनीची भागीदारी आहे. त्यांच्या पत्नीच्या नावावर कंपन्या, रिअल इस्टेट फर्म्स, स्टार्टअप आणि उघड भागीदारी आहे.
आदेशात काय लिहिलं आहे?

उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती संपुष्टात आणण्याबाबत अशा आशयाखाली महसूल व वन विभागाने आदेश काढला आहे. त्यात उप जिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी, झोपुप्रा-1 बांद्रा (शहर मुंबई) अभिजीत भांडे पाटील यांची लोकहितास्तव महसूल विभागास आवश्यकता असल्याने त्यांची प्रतिनियुक्ती या आदेशाद्वारे संपुष्टात आणण्यात येत असा उल्लेख आहे.

पुढे लिहिलं आहे की, उपरोक्त नमूद उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची सेवा महसूल विभागास लोकहितास्तव आवश्यक असल्याने त्यांना महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई येथे रुजू होण्याकरिता त्यांची प्रतिनियुक्ती संपुष्टात आणून दिनांक 24 मार्च 2026 पासून सध्याच्या कार्यरत पदावरुन एकतर्फी कार्यमुक्त करण्यात येत आहे. संबंधित अधिकारी यांनी तात्काळ महसूल विभाग, मंत्रालय, मुंबई येथे रुजू व्हावं.


देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत वाचली अशोक खरातच्या संपत्तीची यादी
- मिरगाव येथे 33 एकर जमीन
- मिरगावात फार्महाऊस
- पाथर्डी गाव 10 एकर जमीन
- सिन्नरमध्ये 6 एकर जमीन
- अहिल्यानगरमध्ये 4.5 एकर जमीन
- काकडी तालुका शिर्डी विमानतळ 5.5 एकर जमीन
- पाथर्डी फाटा प्लॉट
- ओझर जिल्हा नाशिक 4 गुंठ्याचे 3 प्लॉट
- पनवेल 40 गुंठे प्लॉट
- कॅनडा कॉर्नर नाशिक ऑफिस 180 स्क्वेअर फूट
- संगमनेर मुलीच्या नावावर 11 गुंठे प्लॉट
- पुणे मुलीच्या नावावर प्लॉट,
- नाशिक कर्मयोगी नगर बंगला
- शिर्डी तालुका राहता साई सिल्व्हर ओक मंगल कार्यालय
- सिन्नर पाच जणात सहा एकर जमीन
- स्वत:कडे 12 तोळे सोने
- पत्नीकडे 20 तोळे सोने
- पत्नीच्या नावे डीमॅट अकाऊंटवर एक ते दोन लाख गुंतवणूक
- पाच बँक खाते
40 कोटी 87 लाखाचे बाजारमूल्य आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.