सयाजी हॉटेल समूहाच्या या नव्या हॉटेलमुळे पश्चिम महाराष्ट्रातील गजबजलेल्या व्यापारी व कृषी केंद्र असलेल्या सांगलीमध्ये दर्जेदार निवास व्यवस्थेची दीर्घकाळ जाणवत असलेली उणीव भरून निघणार
सांगली:- पश्चिम महाराष्ट्रातील आदरातिथ्य क्षेत्रासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या घडामोडीत सयाजी हॉटेल्सने आपल्या 'एफोटेल' बँडअंतर्गत 'एफोटेल बाय सयाजी, सांगली' या नव्या हॉटेलच्या सुरुवातीची घोषणा केली आहे. सांगली-मिरज रोडवरील शिव आर सिटी मॉलमध्ये धोरणात्मकदृष्ट्या उभारण्यात आलेले हे हॉटेल सांगली शहरात सयाजी समूहाचा ठळक आणि योग्य वेळी झालेला प्रवेश दर्शवते, व्यापारी व कृषी क्षेत्रात भक्कम ओळख असलेल्या सांगलीमध्ये दर्जेदार ब्रँडेड निवास व्यवस्थेची दीर्घकाळ जाणवत असलेली कमतरता लक्षात घेता, ही नवीन सुविधा महत्वाची ठरणार आहे.
या नव्या हॉटेलच्या समावेशामुळे 'एफोटेल बाय सयाजी, सांगली' हे महाराष्ट्रातील 'एफोटेल' ब्रेडचे तिसरे हॉटेल ठरले आहे. यापूर्वी पुणे जिल्ह्यातील सरोला आणि नवी मुंबई येथील हॉटेल्स त्याच्या सिस्टर प्रॉपर्टीज् आहेत. या विस्तारातून सयाजी समूहाची महाराष्ट्रातील उपस्थिती अधिक बळकट होत असून टियर-२ आणि टियर-३ शहरांमध्ये मध्यम-उच्च दर्जाची आदरातिथ्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या त्यांच्या दृष्टीकोनाला अधोरेखित करते.
एफोटेल बाय सयाजी, सांगली येथे एकूण ५९ सुबक आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज अतिथी कक्ष रूम्स उपलब्ध आहेत. हे कक्ष पाच वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागलेले आहेत: १५ ग्रँड रुम्स (२८४ चौ. फूट), ३४ प्रीमियम ग्रँड रूम्स (३०९ चौ. फूट), ६ एक्झिक्युटिव्ह बँड रुम्स (३७३ चौ. फूट), २ ग्रॅड सूट्स (५०६ चौ. फूट) आणि २ प्रीमियम सूट्स (७६६ चौ. फूट), व्यवसायिक प्रवासी, विश्रांतीसाठी येणारे पर्यटक तसेच दीर्घकाळ मुक्काम करणाऱ्या पाहुण्यांच्या गरजा लक्षात घेऊन या खोल्यांची रचना करण्यात आली आहे.
या हॉटेलमधील भोजन व्यवस्था हीदेखील एक महत्त्वाचे आकर्षण ठरणार आहे. येथे दोन वेगवेगळे फूड अँड बेव्हरेज आऊटलेट्स उपलब्ध आहेत- 'द क्यूब', १२० आसन क्षमतेचे दिवसभर सुरु असलेले डायनिंग रेस्टॉरंट आणि 'गुड ओल्ड डेज', ३० पाहुण्यांसाठी आसन व्यवस्था असलेला बार आहे. या दोन्ही ठिकाणी हॉटेलमध्ये मुक्काम करणाऱ्या पाहुण्यांसह शहरातील नागरिकांनाही दर्जेदार भोजनाचा अनुभव घेता येणार आहे.
या हॉटेलमध्ये 'जार्डिन १' आणि 'जार्डिन २' असे दोन बहुउपयोगी बँक्वेट हॉल उपलब्ध आहेत. 'जार्डिन १' सुमारे ४,२९५ चौ. फूट क्षेत्रफळाचा असून थिएटर पद्धतीच्या आसन व्यवस्थेत ३५० पाहुण्यांपर्यत क्षमता आहे. तर 'जार्डिन २' चे क्षेत्रफळ २,३५५ चौ. फूट असून त्यात थिएटर पद्धतीने १५० पाहुण्यांची व्यवस्था करता येते. या सुविधांमुळे एफोटेल बाय सयाजी, सांगली हे शहरातील एमआयसीई (मीटिंग्स, इन्सेंटिव्हस, कॉन्फरन्सेस आणि एक्झिबिशन्स) तसेच सामाजिक कार्यक्रमांसाठी अत्याधुनिक सुविधा असलेले प्रमुख ठिकाण ठरणार आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत सांगलीमध्ये उच्च दर्जाच्या बँक्वेट सुविधांची कमतरता असल्याने ही सुविधा शहरासाठी महत्त्वाची ठरणार आहे.भारताची 'हळदीची राजधानी म्हणून ओळखले जाणारे सांगली हे द्राक्ष उत्पादनासाठीही प्रसिद्ध असलेले एक समृद्ध कृषी व व्यापारी केंद्र आहे. हे हॉटेल सांगली रेल्वे स्थानकापासून सुमारे ७ किमी तर कोल्हापूर विमानतळापासून सुमारे ५० किमी अंतरावर सोयीस्कर ठिकाणी असल्यामुळे देशांतर्गत प्रवासी तसेच प्रादेशिक पाहुण्यांसाठी सहज आणि सुलभप्रवास सुविधा उपलब्ध होते.सांगलीचे हेस्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, कारण हे शहर प्रमुख सांस्कृतिक व व्यापारी केंद्र असलेल्या कोल्हापूरच्या जवळ आहे. कोल्हापूर येथे प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर तसेच वेगाने विकसित होत असलेला व्यावसायिक क्षेत्र आहे. याशिवाय या भागातून युनेस्को जागतिक वारसा स्थळ असेलेले चांदोली राष्ट्रीय उद्यान, सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य, सांगली किल्ला आणि निसर्गरम्य दंडोबा हिल्स फॉरेस्ट रिझव्हं या पर्यटनस्थळांना सहज भेट देता येते. तसेच नरसोबाचीवाडी आणि श्रीक्षेत्र औदुंबर यांसारख्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांमुळे वर्षभर भाविकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा होत असते.सयाजी हॉटेल्सचे असोसिएट जनरल मॅनेजर राजेंद्र जोशी म्हणाले, "सांगली हे आर्थिकदृष्ट्या सक्रिय आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे. मात्र, या शहराच्या प्रतिष्ठेला साजेशी ब्रँडेड आदरातिथ्य सुविधा आतापर्यंत उपलब्ध नव्हती. एफोटेल बाय सयाजी, सांगली या माध्यमातून ती उणीव भरून निघत आहे. हे केवळ आणखी एक हॉटेल सुरू होणे नाही, तर संपूर्ण प्रदेशातील प्रवास आणि कार्यक्रमांच्या अनुभवाला नवे परिमाण देण्याची आमची बांधिलकी आहे. 'एफोटेल' ब्रँडच्या माध्यमातून आम्ही गुणवत्ता, आत्मीयता आणि किमतीच्या दृष्टीने मूल्य देण्याचे आश्वासन अशा बाजारपेठांमध्ये घेऊन येत आहोत. कोल्हापूर-सांगली पट्टा व्यवसाय आणि पर्यटन या दोन्ही क्षेत्रांसाठी प्रचंड क्षमता असलेला आहे आणि आमच्या समूहाच्या वतीने येथे उपस्थिती नोंदवताना आम्हाला अभिमान वाटतो."एलकेजी लाइफस्टाईल एलएलपीचे संचालक, अविनाश गंगवानी म्हणाले, "या प्रकल्पाची संकल्पना मांडताना आम्हाला एक स्पष्ट उणीव जाणवली. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या सांगली शहरात येणाऱ्या पर्यटकांना आणि व्यावसायिक प्रतिनिधींना दर्जेदार निवासाच्या पर्यायांची कमतरता होती. एफोटेल बाय सयाजी परिवाराचा भाग बनल्यामुळे आम्हाला केवळ विश्वासार्ह ब्रँडचे नावच मिळत नाही, तर उत्कृष्ट आदरातिथ्याचा सिद्ध अनुभवही मिळतो. आता आम्ही आमची प्रॉपर्टी सयाजी ग्रुपला सोपवली आहे, आम्हाला त्यांच्या उत्कृष्ट सेवेवर आणि ऑपरेशनल कौशल्यावर पूर्ण विश्वास आहे. आम्हाला विश्वास आहे की, हे हॉटेल महाराष्ट्राच्या आदरातिथ्य नकाशावर सांगलीचे स्थान अधिक भक्कम करेल. तसेच, विशेषतः कोल्हापूर परिसरातील तीर्थक्षेत्रे आणि पर्यटन स्थळांच्या जवळीक लक्षात घेता, शहरातील पर्यटन आणि कॉर्पोरेट कार्यक्रमांच्या वाढत्या परिसंस्थेला हे हॉटेल निश्चितच चालना देईल."सांगलीच्या बाजारपेठांना भेट देणारे कृषी व्यापार क्षेत्रातील व्यावसायिक, कुटुंबासह प्रवास करणारे पर्यटक, भाविक, कॉर्पोरेट प्रतिनिधी तसेच एमआयसीई गट यांच्यासाठी हे हॉटेल एक आदर्श पर्याय ठरणार आहे. तसेच कोल्हापूर-सांगली परिसरातील पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी सांगलीला मुक्कामाचे ठिकाण म्हणून निवडणाऱ्या पर्यटकांसाठीही हे हॉटेल नैसर्गिकरित्या पहिली पसंती ठरेल.
सयाजी हॉटेल्स लिमिटेड विषयी
Sayaji Hotels Ltd हे भारतातील सर्वात ओळखले जाणारे आणि विश्वासार्ह आदरातिथ्य ब्रँडपैकी एक असून, त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण युअर्स इली सेवेसाठी, सुबक आणि विचारपूर्वक रचलेल्या हॉटेल प्रॉपर्टीजसाठी तसेच उत्कृष्टतेबाबतच्या ठाम बांधिलकीसाठी ते प्रसिद्ध आहेत. चार दशकांहून अधिक वारसा लाभलेल्या सयाजी समूहाकडे देशभरातील महत्त्वाच्या शहरांमध्ये ४० हून अधिक हॉटेल प्रॉपर्टीज असून २,५३७ पेक्षा अधिक किज्ञ (रूम्स) उपलब्ध आहेत. व्यवसायिक तसेच विश्रांतीसाठी प्रवास करणाऱ्या पाहुण्यांना संस्मरणीय अनुभव देण्यासाठी सयाजी लक्झरी आणि आत्मीयतेचा संगम घडवतात. दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वातून आकार घेतलेल्या समृद्ध परंपरेमुळे सयाजी ब्रेडला वैयक्तिकृत सेवा, आधुनिक सुविधा आणि पाहुणे-केंद्रित कार्यपद्धतीसाठी विशेष ओळख मिळाली आहे. भारतात "ग्रेट प्लेस टु वर्क " म्हणून मान्यता मिळालेला हा ब्रँड आपल्या हॉटेल्स आणि टीम्समध्ये 'पिपाल फर्स्ट' संस्कृती जोपासत आदरातिथ्य क्षेत्रात नवे मानदंड निर्माण करत आहे. भविष्यातील दृष्टीकोन लक्षात घेता, २०२६ ब्रँड व्हिजन अंतर्गत सयाजी समूह धोरणात्मक विस्तार आणि नव्या उत्पादन संकल्पनांवर भर देत उदयोन्मुख तसेच स्थापित बाजारपेठांमध्ये जागतिक दर्जाच्या आणि सर्वसमावेशक आदरातिथ्य अनुभवांची निर्मिती करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
सांगली दर्पण परिवाराकडून भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🌹
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.