Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली जिल्ह्यातील हॉटेल्स बंद होण्याची भीती

सांगली जिल्ह्यातील हॉटेल्स बंद होण्याची भीती



सांगली : इराणविरोधात इस्रायल-अमेरिका युद्धाच्या परिणामांची व्याप्ती वाढत असून पहिला झटका व्यावसायिक गॅस पुरवठ्यास बसला आहे. जिल्ह्यातील व्यावसायिक गॅसचा पुरवठा पूर्ण बंद करण्यात आला आहे. परिणामी, येत्या दोन दिवसांत हॉटेल व्यवसाय पूर्ण बंद राहण्याची चिन्हे आहेत. तसेच पोळी-भाजी केंद्रे, गाड्यांवरील खाद्यपदार्थांची विक्रीही बंद होण्याची भीती आहे. त्यामुळे प्रवाशांसह स्थानिक नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. 

गेल्या चार दिवसांपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा मर्यादित स्वरूपात सुरू होता. तो आता पूर्णपणे बंद केल्यामुळे येत्या दोन-तीन दिवसांत ‌'शटडाऊन‌' करावे लागेल. व्यावसायिक गॅसचा पुरवठा बंद करण्यात आला असला, तरी विद्यार्थी वसतिगृहे, हॉस्पिटल्स, अत्यावश्यक उद्योगांना गॅस सिलिंडर उपलब्ध करून दिले जाण्याची शक्यता आहे. याबाबत प्रशासनाकडून आढावा घेण्यात आला आहे.



हॉटेल्स, खाद्यपदार्थ व्यावसायिकांची आज बैठक
हॉटेल्स, खाद्यपदार्थ व्यावसायिकांची सांगलीत गुरुवारी सकाळी 11 वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. सांगली-मिरज रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये होणाऱ्या या बैठकीनंतर संघटनेचे पदाधिकारी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची भेट घेऊन समस्या मांडणार आहेत.

- लहू भडेकर, अध्यक्ष, हॉटेल, खाद्यपदार्थ संघटना, सांगलीप्रशासनाकडून व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा पूर्णपणे बंद केला आहे. या पार्श्वभूमीवर संघटनेची बैठक होईल. गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत न झाल्यास व्यवसाय बंद करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. यातून जिल्हा प्रशासनाने मार्ग काढावा, अशी आमची मागणी आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.