Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बलात्कारी ऋषिकेश वैद्यची भाजप महिला पदाधिकाऱ्याकडून पाठराखण, म्हणाल्या, 'धर्माची बदनामी...'

बलात्कारी ऋषिकेश वैद्यची भाजप महिला पदाधिकाऱ्याकडून पाठराखण, म्हणाल्या, 'धर्माची बदनामी...'


पुण्यातील महिलेवर अत्याचार करणाऱ्या वसईतील स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्यला पोलिसांनी अटक केली आहे. सोशल मीडियातून महिलेशी संपर्क साधून आधात्माच्या नावाखाली वैद्यने महिलेवर अत्याचार केला होता. अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर महिलेने हिमतीने या विषयी आपल्या पतीला सांगितले. त्यानंतर त्यांनी या प्रकरणी वसईच्या माणिकपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी हे प्रकरण हडपसर पोलिसांकडे वर्ग केले होते. पोलिसांनी ऋषिकेश वैद्यला पिंपरीमधून अटक केले. दरम्यान, मुंबईतील भाजपच्या महिला पदाधिकारी अक्षता तेंडूलकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सर्वच चॅनेल्सवर ऋषिकेश वैद्य गुरुजींबद्दल अपप्रचार सुरू असल्याचे दिसत आहे, असे म्हणत त्याची पाठराखण केली. त्या म्हणाल्या, '2024 मध्ये नेमकं काय घडलं, याबाबत ठोस पुरावे समोर आलेले नसताना अशा प्रकारे कोणाचीही बदनामी करणे योग्य नाही. जर पीडित महिलेने सांगितल्याप्रमाणे काही घडलं असेल, तर त्याची सखोल चौकशी व्हायलाच हवी आणि ते सिद्ध झाल्यास संबंधितांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे.', 'केवळ ऐकीव किंवा अपूर्ण माहितीच्या आधारावर कोणावरही आरोप करणे, किंवा माध्यमांमधून त्यांची प्रतिमा खराब करणे चुकीचे आहे. अशा गोष्टींमुळे केवळ एका व्यक्तीची नव्हे, तर आपल्या समाजाची आणि धर्माचीही बदनामी होते.', असे देखील त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.