अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. सोमवारी उशिरा पाकिस्ताननेअफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये केलेल्या भीषण एअरस्ट्राईकमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात एका नशामुक्ती केंद्राला लक्ष्य करण्यात आले असून, मृतांचा आकडा ४०० वर पोहोचला आहे. मृतांमध्ये बहुतांश रुग्ण आणि सामान्य नागरिकांचा समावेश असल्याचे तालिबान सरकारने म्हटले आहे.
नेमकी घटना काय?
काबुलमधील एका नशामुक्ती केंद्रावर पाकिस्तानी लष्करी विमानांनी बॉम्बफेक केली. या हल्ल्यात हॉस्पिटलचा मोठा भाग उद्ध्वस्त झाला असून ढिगाऱ्याखाली अनेक लोक गाडले गेले आहेत. सुरुवातीला हा आकडा २५० सांगण्यात आला होता, मात्र अफगाणिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने मृतांची संख्या ४०० पर्यंत वाढल्याची पुष्टी केली आहे. याशिवाय २५० हून अधिक लोक जखमी आहेत.
रमजानच्या २८ व्या रात्रीची शोकांतिका
अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू मोहम्मद नबी याने सोशल मीडियावर या हल्ल्याचा व्हिडिओ शेअर करत शोक व्यक्त केला आहे. त्याने म्हटले की, "रमजानच्या २८ व्या रात्री आशा पल्लवित करण्यासाठी आलेल्या रुग्णांची हत्या करण्यात आली, हे अत्यंत वेदनादायक आहे".
पाकिस्तानचा इन्कार
पाकिस्तानने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, पाकिस्तानने केवळ दहशतवादी तळ आणि लष्करी ठिकाणांना लक्ष्य केले असून कोणत्याही नागरी वस्तीवर किंवा हॉस्पिटलवर हल्ला केलेला नाही. पाकिस्तानच्या मते, अफगाण भूमीचा वापर करून 'तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान' हे गट पाकिस्तानवर हल्ले करत आहेत.
आंतरराष्ट्रीय स्तरावर निषेध
पूर्व अफगाण सरकारचे प्रमुख अब्दुल्ला अब्दुल्ला यांनी या हल्ल्याचा निषेध केला असून याला 'आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन' म्हटले आहे. तसेच स्टार क्रिकेटपटू राशिद खान यानेही हॉस्पिटल आणि रहिवासी भागांना लक्ष्य करणे हा 'वॉर क्राईम' असल्याचे म्हटले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
