Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रॉकेलचा दर काय? रेशन दुकानावर आणि बाहेर 'एवढ्याला' मिळतेय; एलपीजी टंचाईमुळे लोक वळले...

रॉकेलचा दर काय? रेशन दुकानावर आणि बाहेर 'एवढ्याला' मिळतेय; एलपीजी टंचाईमुळे लोक वळले...


मध्यपूर्वेतील युद्धामुळे गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाला असून, राज्यात आता 'रॉकेल' (केरोसिन) युगाचे पुनरागमन झाले आहे. गॅस संपण्याच्या भीतीमुळे आणि नवीन सिलिंडर मिळण्यास विलंब होत असल्याने, लोकांनी अडगळीत पडलेले स्टोव्ह बाहेर काढले आहेत. यामुळे बाजारात रॉकेलच्या मागणीत वाढ झाली असून दरांमध्येही मोठी तफावत दिसून येत आहे.

रॉकेलचे ताजे दर
सध्या पुण्यातील बाजारपेठेत रॉकेल खालील दराने मिळत आहे:

रेशन दुकान : ₹६० प्रति लिटर.

काळा बाजार : ₹१०० ते ₹१२० प्रति लिटर.
रेशनिंगवर रॉकेल पुन्हा उपलब्ध

गेल्या काही वर्षांत रेशनवरील रॉकेल बंद करण्यात आले होते. मात्र, सध्याची आणीबाणीची परिस्थिती आणि एलपीजी शॉर्टेज पाहता, सरकारने पुन्हा एकदा रेशन दुकानांवर रॉकेलचा पुरवठा सुरू केला आहे. प्रामुख्याने ज्यांच्याकडे गॅस कनेक्शन नाही किंवा ज्यांचे सिलिंडर वेळेवर येत नाहीत, अशा लोकांसाठी हा मोठा आधार ठरत आहे.

'पॅनिक बाइंग' आणि काळा बाजार
लोकांमध्ये सध्या पॅनिक बाइंग सुरु झाले आहे. इराण युद्द सुरु झाल्यानंतर एलपीजीसाठी नंबर लावण्यास सुरुवात झाली होती. ती संपत नाही तोच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत कोरोना लॉकडाऊन सारखी परिस्थिती उद्भवू शकते, असे सांगितल्याने लोकांनी पेट्रोल, डिझेलसाठी देखील रांगा लावण्यास सुरुवात केली. त्यात कंपन्यांनी इंधनाचे दर वाढतील म्हणून पेट्रोल पंपांनाच पुरवठा कमी केला. याचा परिणाम अफवा आणि पॅनिक बाइंग वाढण्यावर झाला.
महाराष्ट्राचे केरोसीन (रॉकेल)वाटप

१) एकूण वाटप
केंद्र शासनाने महाराष्ट्र राज्यास ३,७४४ KL (३७,४४,००० लिटर) रॉकेल वाटप केले आहे.
२) प्रति लाभार्थी
प्रति कुटुंब/प्रति शिधापत्रिका ३ (तीन) लिटर रॉकेल अनुज्ञेय राहील.

कुणाला मिळणार रॉकेल?
◼️ AAY व PHH शिधापत्रिकाधारकांना रॉकेल वितरणास प्राधान्य देण्यात येईल.
◼️ रॉकेल विक्रीस मिळत असलेल्या प्रतिसादाचा विचार करुन रॉकेल उपलब्धतेनुसार श्वेतपत्रिकाधारक देखील रॉकेल मिळण्यास पात्र असतील.
◼️ ज्या कुटंबाकडे शिधापत्रिका नाही असे कुटुंब देखील रॉकेल उपलब्धतेनुसार रॉकेल वितरणास पात्र राहतील. (ग्रामपंचायत रहिवासी दाखला पुरावा ग्राह्य धरण्यात यावा.)
◼️ स्थलांतरीत मजूर देखील रॉकेल उपलब्धतेनुसार रॉकेल वितरणास पात्र राहतील. (केंद्र शासनाचे/राज्य शासनाचे ओळखपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात यावे.)

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.