अमित शाहांसोबतही खरातच फोटो; मग कारवाई फक्त एकावर का? थेट सवाल करत नाना पटोलेंचा गौप्यस्फोट


भंडारा: रूपाली चाकणकर एक महिला असल्याने तिला टार्गेट केल्या जात आहे का? अशोक खरातसोबत देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि राज्यातील अनेक मंत्र्यांचे फोटो, व्हिडिओ समोर येत आहेत.

त्यांच्यावर सुद्धा आता कारवाई होणार का? असा प्रश्न कॉँग्रेसचे नेते तथा आमदार नाना पटोले यांनी उपस्थित केलाय. मंत्रीच नाहीतर खरातच्या प्रकरणामध्ये मंत्रालयातील अनेक अधिकारी सुद्धा सहभागी असल्याचा गौप्यस्पोट नाना पटोले यांनी केलाय. मागच्या अधिवेशनामध्ये सुद्धा मी नाशिकचाच मुद्दा घेतला होता. आता खरात कोण आहे, ते समोर आलं.

राज्याचे मुख्यमंत्री हेच गृहमंत्री असताना त्यांनी सांगितली होती, अशी कुठलीही घटना घडली नाही. खराच नव्हे तर, नाशिकमध्ये आणखी एक आहे ज्यामध्ये काही अधिकारी, मंत्री सुद्धा सहभागी आहेत. ज्या नाशिकमध्ये महाकुंभ होत आहे. तिथं अशी घटना घडते आणि यात महाराष्ट्र बदनाम होतोय. मागच्या वेळेस मी विधानसभेत पेनड्राईव्ह दिला होता. मात्र, तो मुख्यमंत्र्यांनी का लपवला?? प्रकरण तेव्हाच उघडकीस आले असते. या प्रकाराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अगदी तीन दिवसातच SIT स्थापन केली. SIT ची मागणी कुणीही केलेली नसताना राज्य सरकारने SIT स्थापन का केली?

या संपूर्ण प्रकरणाच्या संदर्भात आम्ही उद्या विधानसभेत स्थगन प्रस्ताव आणून राज्य सरकारला खुलासा मागणार आहोत. वेळ आली तर सरकारला या प्रकरणात राजीनामा सुद्धा द्यावा, लागेल असा थेट इशारा नाना पटोलेंनी दिला आहे.

खरात प्रकरण अतिशय संवेदनशील....दोषींवर निश्चितच कारवाई होणार- पंकज भोयर

दरम्यान प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता प्रकरण महिलांच्या संदर्भातील असल्याने प्रकरण संवेदनशील आहे. म्हणून या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी एका IPS महिला अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात SITC ची स्थापना करण्यात आली आहे. चौकशीमध्ये जे जे दोषी आढळतील त्या सर्वांवर कारवाई करण्यात येईल. अधिकारी असो, लोकप्रतिनिधी असो जे दोषी असतील त्या सर्वांवर कायद्याच्या प्रोव्हिजनुसार कारवाई करण्यात येईल. अशी भूमिका राज्याचे गृहमंत्री तथा भंडाऱ्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांनी मांडली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.