Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मोदीजी 'अपशकुनी'! ट्वेंटी-२० वर्ल्ड कप फायनल अहमदाबादमध्ये नको, मुंबईत खेळवा...; कोणी केलंय हे वादग्रस्त विधान?

मोदीजी 'अपशकुनी'! ट्वेंटी-२० वर्ल्ड कप फायनल अहमदाबादमध्ये नको, मुंबईत खेळवा...; कोणी केलंय हे वादग्रस्त विधान?

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप अंतिम टप्प्यात आला आहे आणि आज स्पर्धेची पहिली उपांत्य फेरीची लढत न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात कोलकाताच्या इडन गार्डनवर होणार आहे.

५ मार्च रोजी होणाऱ्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारत विरुद्ध इंग्लंड असा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होईल. दोन्ही उपांत्य फेरीतील विजेता संघ ८ मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर जेतेपदासाठी भिडतील.

पण, त्याआधीच आता राजकारण तापू लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'अपशकुनी' म्हणून फायनल मुंबईत हलवण्याची मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार हुसेन दलवाई यांनी केली आहे. मुंबई हे "क्रिकेटचे खरे घर" असल्याचा दावा दलवाई यांनी केला आहे. अंतिम सामना अहमदाबादमध्ये आयोजित करण्याऐवजी मुंबईत त्याचे नियोजन करता येईल. उपांत्य फेरीचा सामना अहमदाबाद इथे होऊ द्या आणि अंतिम सामना मुंबईतच होऊ द्या,असा युक्तिवाद त्यांनी केला आहे.

२०२३ च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेची फायनल तिथे खेळवली गेली होती आणि अपराजित भारत जेतेपदाच्या लढतीत ऑस्ट्रेलियाकडून हरला होता. यंदाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर ८ची लढतीतही भारत अहमदाबादमध्ये आफ्रिकेकडून पराभूत झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना दलवाई पुढे म्हणाले, "मोदीजी अपशकुनी आहेत. एकदा आपण तिथे हरलो आहोत, आपल्याला खरोखरच तो अनुभव पुन्हा घेण्याची गरज आहे का?"

वानखेडे स्टेडियमवर शांतता ठेवू...

२०२२, २०२४ मधील ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतही भारत-इंग्लंड यांच्यात उपांत्य सामने झाले होते. त्यात २०२२ मध्ये इंग्लंडने १० विकेटने, तर २०२४ मध्ये भारताने ६८ धावांनी विजय मिळवला होता. त्यामुळे आता तिसरी लढत कोण जिंकणार, याची उत्सुकता वाढली आहे.

वानखेडे स्टेडियमवर आम्ही बऱ्याचदा खेळलो आहोत. त्यामुळे हे मैदानात आम्हाला चांगले परिचित आहे. आमचा सुपर-८ मधील अखेरचा सामना शुक्रवारी झाला. शनिवारी मुंबईत आल्यानंतर दोन दिवस अधिक आम्हाला येथे सराव करता आला. वानखेडे स्टेडियमवर पुन्हा आल्यावर येथील परिस्थिती पुन्हा जाणून घेता आली, असे सॅम करनने पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.