Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली :- शेतीतील कामासाठी बहुपयोगी वाहनाची निर्मिती मालगावची कृषिकन्या संयोगिता चव्हाण हिचे नवे संशोधन

सांगली :- शेतीतील कामासाठी बहुपयोगी वाहनाची निर्मिती मालगावची कृषिकन्या संयोगिता चव्हाण हिचे नवे संशोधन 

“मालगावची बर्था बेंझ” 
“मालगावची बर्था बेंझ” — आंतरराष्ट्रीय महिला दिनी शेतकऱ्यांसाठी इनोव्हेटिव्ह ATV साकार
आंतरराष्ट्रीय महिला दिन (८ मार्च) आणि २०२६ हे आंतरराष्ट्रीय महिला कृषी वर्ष साजरे होत असताना, मालगावच्या एका धाडसी आणि innovative mindset असलेल्या संयोगिता चव्हाण यांनी शेतकऱ्यांसाठी बहुउपयोगी असा कृषी ATV (All Terrain Vehicle) वाहन,विकसित करून ग्रामीण भारतात नव्या युगाची सुरुवात केली आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे परिसरात त्यांना “मालगावची बर्था बेंझ” अशी ओळख मिळू लागली आहे. जगातील पहिल्या ऑटोमोबाईल क्षेत्रातील प्रवर्तक महिला बर्था बेंझ यांच्या जिद्दी आणि दूरदृष्टीतून प्रेरणा घेत, या तरुणीने शेती क्षेत्रातील अडचणींवर तांत्रिक उपाय शोधण्याचा धाडसी प्रयत्न केला आहे.शेतीमध्ये येणाऱ्या अडचणी, मजूर टंचाई, वाढता खर्च आणि कष्टप्रद शेतीकाम या सर्व पार्श्वभूमीवर त्यांनी विकसित केलेला हे ATV शेतकऱ्यांसाठी एक प्रभावी आणि किफायतशीर समाधान ठरत आहे.



ATV ची प्रमुख वैशिष्ट्ये:

●फवारणी यंत्रणा जोडण्याची सुविधा
●मालवाहतूक  करण्यासाठी ट्रेलर ची सुविधा
विविध शेती अवजारे सहज जोडता येण्याची संरचना
◆फवारणी यंत्र ◆खत विस्कटणे यंत्र◆सर्व प्रकारचे बियाणे टोकणे पेरणे यासाठी पेरणी यंत्र
◆गहु ,खपली, सोयाबीन,हरबरा कापणी यंत्र
◆उंच झाडावरची फळे काढण्यासाठी विशेष लिफ्ट 
◆टेंपो ट्रक मध्ये सामान,माल चढ-उतार करण्यासाठी ATV वर एका विशिष्ट प्रकारची लिफ्ट सुविधा
◆ATV चे प्रमुख वैशिष्ट्य ATV ला पाठीमागे व पुढे दोन्ही कडे उपकरणे सहज जोडता येतील यासाठी पुढे व पाठीमागे हायड्रोलिक बसवण्याची सोय 

या  ATV ची रचना सोपी आणि हाताळण्यासाठी सुलभ असल्याने महिला सहज चालवू शकतात. नावाप्रमाणेच (All Terrain vehicle) ATV हे मशीन कोणत्याही भौगोलिक परिस्थितीत चालवण्यास आत्यंतिक सुखकारक.

इंधन खर्च  ईतर शेती मशीन च्या तुलनेत कमी आहे.इलेक्ट्रिक आणि पेट्रोल दोन्ही mode मध्ये हे वाहन उपलब्ध आहे.

या  कृषी ATV ला INFIELD असे नाव दिलेले आहे आणि "Born in the Field" अशी त्याची स्लोगन आहे.त्याचे सविस्तर व्हिडीओ त्यांच्या INFIELD या Youtube चैनल वरून किंवा @Infield@3 या हैंडल वरून लवकरच प्रसारित होतील. 

२०२६ हे आंतरराष्ट्रीय महिला कृषी वर्ष असल्याने कृषी क्षेत्रात नवकल्पना आणि शाश्वत तंत्रज्ञानाचा प्रसार अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. अशा काळात एका ग्रामीण तरुणीने पुढाकार घेऊन शेतीसाठी आधुनिक वाहन विकसित करणे ही महिला सक्षमीकरण आणि कृषी आधुनिकीकरण यांची प्रभावी सांगड मानली जात आहे.

“शेतकऱ्यांचे कष्ट कमी व्हावेत, त्यांना आधुनिक आणि परवडणारे साधन मिळावे, हीच माझी प्रेरणा आहे. महिला देखील तंत्रज्ञान क्षेत्रात नेतृत्व करू शकतात, हे सिद्ध करायचे होते,” असे त्या संयोगिता यांनी सांगितले.

मालगावच्या संयोगिता चव्हाण यांची कामगिरी केवळ स्थानिक पातळीपुरती मर्यादित नसून त्यांच्या वाहनाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर दखील घेतली जात आहे. महिला दिनानिमित्त त्यांची ही यशोगाथा समाजासाठी नवा संदेश देणारी ठरेल.
संपर्क:
नाव: ___संयोगिता यशवंत चव्हाण_______________
पद: __Marketing Director INFIELD______________
मोबाईल नंबर:+919370564221

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.