Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

द्राक्ष बागायतदारांच्या रोषानंतर पंजाबराव डखांची मोठी घोषणा; 'या' जिल्ह्यांचा अंदाज आजपासून बंद

द्राक्ष बागायतदारांच्या रोषानंतर पंजाबराव डखांची मोठी घोषणा; 'या' जिल्ह्यांचा अंदाज आजपासून बंद



पंजाबराव डख  हे पावसाचा अंदाज वर्तवितात. परंतु त्यांच्या अंदाजाबाबत काही जण शंका उपस्थितीत करतात. काही वेळेस अंदाज खरेही ठरतात. डख यांच्या पावसाच्या अंदाजानंतर शेतकरी हे शेतातील कामे पूर्ण करतात, शेतातील पिके काढून घेतात.

परंतु द्राक्ष बायागतदारांचा याचा फटका बसतो. पश्चिम महाराष्ट्रात द्राक्ष बायायतदार आहेत. डख यांनी पावसाचा अंदाज व्यक्त केल्यानंतर द्राक्षाची भाव पडतात, असा रोष द्राक्ष उत्पादकांचा आहे. डख यांच्याविरोधात दोन दिवसांपूर्वी पंढरपूर येथील द्राक्ष उत्पादकांनी आंदोलन केले आहे. त्यानंतर पंजाबराव डख यांनी पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे आणि जळगावचा हवामान अंदाज सांगणार नसल्याचे जाहीर केले आहे.

फेसबुकवर व्हिडिओ जारी करून निर्णय
पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांसह नाशिक जिल्ह्यातील पावसाचा अंदाज देऊ नये, अशी मागणी द्राक्ष बागायतदारांकडून होत असल्याने पंजाबराव डख यांनी हा निर्णय घेतलाय. मी पावसाचा अंदाज सांगितल्यानंतर गव्हू, हरभरा, कांदा पिक काढण्याबाबत पूर्व कल्पना येते. त्यामुळे शेतकरी आपल्या पिकाची व्यवस्था करतात. पिक झाकून ठेवतात. परंतु माझ्या अंदाजामुळे भाव पडत असले तर तिकडे अंदाज देणार नाही, असे डख यांनी स्पष्ट केले आहे.
विदर्भासह याच जिल्ह्यांचा अंदाज देणार

विदर्भात, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, अहिल्यानगर, धुळे, नंदूरबार जिल्ह्यांचा अंदाज देणार आहे. द्राक्षपट्ट्यातील अंदाज देणार नाही. कोरवाडू शेतकऱ्यांसाठी अंदाज देणार असल्याचे पंजाबराव डख यांनी म्हटलंय.

द्राक्ष बागायतदारांकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी
पंजाबराव डख आणि बांगर यांच्याविरोधात पंढपुरातील द्राक्ष बागतदारांनी आंदोलन केलं आहे. या बोगस हवामान अंदाज वर्तवणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करा, अशी मागणीच त्यांनी केली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.