Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शेतकऱ्यांनो, कर्जमाफीसाठी 'ही' नोंदणी आहे खूपच गरजेची, अन्यथा व्हाल अपात्र

शेतकऱ्यांनो, कर्जमाफीसाठी 'ही' नोंदणी आहे खूपच गरजेची, अन्यथा व्हाल अपात्र



महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. शेतकऱ्यांचं २ लाखांपर्यंतचं पीककर्ज माफ करण्यात येणार असल्याचं फडणवीस यांनी म्हंटल. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी योजना असं या योजनेचं नाव असून या योजनेअंतर्गत 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचे थकीत कर्ज माफ होणार आहे. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेल्या डिजिटल नोंदणी प्रक्रियेकडे अनेक शेतकरी दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.

सरकारने शेतकऱ्यांची माहिती एकत्रित करण्यासाठी AgriStack अॅप सुरू केले आहे. शेतकरी कर्जमाफीसह इतर कोणत्याही शेतीविषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी या अॅपमध्ये नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. तरीही अनेक शेतकऱ्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही किंवा नोंदणीची प्रक्रिया सुरु केलेली नाही. त्यामुळे काही शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 
शासन सध्या विविध कृषी योजना, अनुदान आणि कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचा डिजिटल डेटाबेस तयार करण्याचे काम वेगाने करत आहे. यासाठी प्रत्येक शेतकऱ्याची सविस्तर माहिती अॅग्रीस्टॅक प्रणालीमध्ये नोंदवली जात आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांनी वेळेत नोंदणी न केल्यामुळे प्रशासनास अडचणी येत आहेत. नोंदणी अपूर्ण राहिल्यास त्या शेतकऱ्यांची माहिती शासनाच्या पोर्टलवर पूर्णपणे नोंदवली जात नाही. त्यामुळे कर्जमाफीसाठी पात्र असतानाही काही शेतकरी लाभापासून वंचित राहू शकतात.

दरम्यान, नोंदणी प्रक्रियेत काही तांत्रिक अडचणीही समोर येत आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या आधारकार्ड, फार्मर आयडी किंवा इतर कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यामुळे नोंदणी प्रक्रिया अडकते. काही शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर न केल्यामुळे अर्ज अपूर्ण राहतात. याशिवाय, काही शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टॅक अॅपमध्ये नोंदणी सुरू केली असली तरी ती अंतिम टप्प्यापर्यंत पूर्ण केलेली नाही. त्यामुळे ऑनलाइन प्रणालीमध्ये त्यांची माहिती पूर्णपणे नोंदवली जात नाही.
दरम्यान, कर्जमाफीसाठी आवश्यक माहिती गोळा करण्याचं करण्याचे काम वेगाने सुरू आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यातील सेवा सहकारी संस्था आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखांमार्फत थकीत कर्जदार शेतकऱ्यांचा तपशील गोळा केला जात आहे. ही माहिती शासनाच्या अधिकृत पोर्टलवर अपलोड केली जात असून त्यावरून पुढील प्रक्रिया ठरवली जाणार आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांनी अद्याप आधारकार्ड, अॅग्रीस्टॅक नोंदणी आणि इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित संस्थांकडे जमा केलेली नाहीत. त्यामुळे माहिती अपूर्ण राहत असून बँकांनाही नोंदणी प्रक्रियेत अडथळे येत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.