सह्याद्री ते हिमालय... देवराष्ट्र, महाराष्ट्र, राष्ट्र... मधुकर भावे
१२ मार्च हा यशवंतरावांचा जन्म िदन. त्यांची ११४ वी जयंती. महाराष्ट्राला यशवंतरावांची या िदवशी िकती आठवण राहील हे सांगता येणार नाही. कारण यशवंतरावांचा महाराष्ट्र आता राहीलेलाच नाही. पण त्यामुळे यशवंतरावांना उणेपणा येत नाही. उणेपणा येत असेल तर तो महाराष्ट्रालाच येईल.
देवराष्ट्र या छोट्या खेड्यात गरिबीत जन्माला आलेल्या या दूरदृष्टीच्या नेत्याच्या गावाचे नाव त्यांचं मोठेपण त्याच िदवशी सांगून जात. देवराष्ट्र या खेड्यात जन्माला आलेल्या यशवंतरावांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवावे... त्यांच्या िनर्णयाचे देशातील राज्यांनी अनुकरण करावे आिण देशावर संकट आल्यावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने संरक्षणमंत्री म्हणून राष्ट्रासाठी धावून जावे... देवराष्ट्र, महाराष्ट्र आिण राष्ट्र हा िकती सुरेख ित्रकोण यशवंरावांच्या जीवनाची यशस्विता सांगणारा आहे. यशवंतरावांच्या उंचीचा, त्यांच्या दूरदृष्टीचा, सुसंस्कृत सभ्य राजकारणाचा एक वस्तुपाठ त्यांनी कृतीने दाखवून िदला. यशवंतरावांचे मोठेपण ते ज्या पदावर बसलेत त्यामुळे नाही. त्यांच्या सुसंस्कृत वागण्यात, बोलण्यात आिण राज्याला, देशाला, कोणाचा उपयोग होईल याची पारख करण्यात त्यांचं मोठेपण आहे. महाराष्ट्रात त्यांनी जी माणसं िटपली, िनवडली आिण महाराष्ट्राच्या आिण देशाच्या राजकारणासाठी खूबीने उपयोग करुन घेतला. ही दूरदृष्टी आिण त्यांची वैचािरक उंची मला सगळ्यात महत्वाची वाटते. िहंदीमध्ये एक चांगला शब्द आहे.... ‘सोच’... यशवंतरावांची ही ‘सोच’ इतकी जबरदस्त होती की, राज्य चालवताना ते कोणासाठी चालवायचं याचे नेमके भान त्यांना होेते. त्यामुळे महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्याबरोबर त्यांनी पहिला विचार मांडला कृषी-अौद्योिगक क्रांतीचा. मला शेतकऱ्याच्या शेतात ट्रॅक्टर पहायचा आहे आिण त्याच्या दारात ‘फटफटी’ पाहायची आहे. हे त्यांच वाक्य महाबळेश्वरच्या १९६१ च्या िशबिरातलं आहे. कार्यकर्त्यांना त्यांनी बजावलं की, केवळ राजकारण न करता समाजकारण करा,वाचन करा, विचार करुन वाचा... आिण वाचून विचार करा.
देशपातळीवरची आजची पंचायत राज व्यवस्था’ याची सुरुवात महाराष्ट्रापासून झाली आहे. आिण ती यशवंतरावांनी केली आहे. गुजरातमध्ये पंचायत व्यवस्था होती पण त्याचा अध्यक्ष कलेक्टर होता. यशवंतरावांनी ते प्रारुप नाकारले आिण स्पष्ट केले की, ग्रामीण भागातून िनवडून आलेला कार्यकर्ता पंचायत समिती िकंवा िजल्हा परिषदेचा अध्यक्ष झाला पािहजे आिण एक िदवस असा आला पािहजे की, पंचायत समितीचा सभापती िकंवा िजल्हा परिषदेचा अध्यक्ष महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला पािहजे. हे शब्द त्यांनी ज्या शिबिरात उच्चारले आिण सांिगतले की, एक िदवस असा उजाडेल... अािण तो िदवस उजाडला. जेव्हा यवतमाळ िजल्हा परिषदेचे अध्यक्ष असलेले सुधाकरराव नाईक १९९१ ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आिण लातूर पंचायत समितीचे उपसभापती असलेले िवलासराव देशमुख १९९९ साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. या पंचायतराज समितीचे प्रारुप यशवंतरावांनी त्यावेळचे महसूलमंत्री वसंतराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून हा दस्तावेज तयार करुन घेतला तो ३९२ पानांचा आहे. देशभर हाच अहवाल स्वीकारला गेला आिण ग्रामीण भागातला कार्यकर्ता, राज्यकर्ता होवू शकतो हे महाराष्ट्राने देशाला दाखवून दिले.
यशवंतरावांनी स्थापन केलेली एमआयडीसी ग्रामीण भागात किती मोठा रोजगार निर्माण करुन गेली आहे, हे आपण पाहत आहोत. राज्य चालवताना िवकासाच्या बरोबर स्ाांस्कृितक भूिमका िततकीच उच्च दर्जाची होती म्हणूनच त्यांनी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यासारख्या पुरोगामी विचाराच्या पंिडताला सािहत्यसंस्कृती मंडळाचे अध्यक्ष केले. दुसरीकडे सहकारी साखर कारखाने, सहकारी सूत िगरण्या आिण कोयनेसारख्या धरणाची निर्मिती करण्यात पुढाकार. आिण त्याच्या पाहणीकरीता पंिडत नेहरुंना आणणे. प्रत्येक िवषयात यशवंतरावांनी एक दृष्टी होती. याचवेळी पंडीतजींच्या हस्ते कराडच्या शासकीय विश्रामगृहात वि रोधीपक्षातील िदग्गज नेते यशवंतराव मोिहते यांच्या कॉंग्रेस प्रवेशाची पावती १९६० साली नेहरुंच्या हस्ते त्यांना िदली गेली. त्यावेळी यशवंतरावांनी संयुक्त महाराष्ट्र राज्य होत आहे. याची जणू सुरुवात करुन िदली हाेती. या सर्व राजकीय भूिमकेला त्यांनी बेरजेचे राजकारण म्हणून असं नाव िदलं. त्यांनी कर्तबगार नेत्यांना कॉंग्रेसमध्ये घेतलं. त्यात यशवंतराव मोिहते, भाऊसाहेब थोरात, अाण्णासाहेब िशंदे, शंकरराव मोिहते पाटील, या कर्तृत्ववान नेत्यांना समावेश हाेता. कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या पक्षासोबत यशवंतरावांना निर्माण केलेली जवळीक िवचारपूर्वक होती. आज यशवंतरावांच्या जयंतीमुळे यशवंरावांचा सगळा जीवनपट असा डोळ्यासमोरुन जातोय. माणसं जोडण्याची एक िवलक्षण खूबी त्यांच्याजवळ होती. वागण्यातली नम्रता आिण चािरत्र्य. याला तर तोड नाही.
श्री कमल िकशोर कदम यांनी एक िकस्सा सांिगतला. ते आिण त्यांचे काही कार्यकर्ते यशवंतरावांना िदल्लीला भेटायला गेेले. कामाची चर्चा झाल्यावर ही मंडळी िनघाली. तेव्हा यशवंतराव त्यांना फाटकापर्यंत सोडायला आले. कमलबाबू संकोचले... ते म्हणाले, ‘साहेब, तुम्ही कशाला त्रास घेता’ यशवंतरावांनी काय सांगावे... ‘अरे, तुम्ही नांदेडपासून िदल्लीपर्यंत आलात, केवढा त्रास घेतलात. मला फाटकापर्यंत सोडायला पण येता येणार नाही...’ यशवंतराव समजवून घ्यायला फार मोठया उदाहरणांची गरज नाही. त्यांच्या वागण्या बोलण्यात ते खूपकाही िशकून जायचे. महाराष्ट्राला राजकीय दृष्ट्या परीपक्व करताना महाराष्ट्राची बांधणी करण्याचे काम त्यांनी अितशय मनस्वीपणे केले. त्यांच्या जन्म शताब्दीवर्षात १०० वे भाषण यशवंतरावांचा जन्म झाला त्या देवराष्ट्र गावातील त्यांच्या जुन्या घरातील पडवीमध्ये १०० व्या भाषणाने हा समारोप केला. आज हे सर्व डोळ्यासमोर येत आहे. त्यांच्या जन्म शताब्दीवर्षात सह्याद्री ते िहमालय या ३०० पानी संदर्भ ग्रंथाची निर्मिती करता आली. एक राजकारणी असलेले यशवंतरावांची पुस्तके वाचली तरी हा नेता केवळ राजकारणी नव्हता तर एक परिपूर्ण सािहत्यीक होता. ‘कृष्णाकाठ’, ‘सह्याद्रीचे वारे’, ‘भूिमका’, ‘युगांतर’, ‘ऋणानुबंध’ ‘शब्दांचे सामर्थ्य’, या सगळ्या पुस्तकातून यशवंतरावांचे व्यक्तिमत्व राजकारणापेक्षा िकतीतरी मोठे होते. याची जाणीव पदोपदी होते.
शरद पवार यांच्यासारख्या मोठ्या नेत्याला यशवंतरावांनीच हुडकून काढले आिण शेकापक्षाची परंपरा असलेल्या घरातून कॉंग्रेसमध्ये घेतले. माणसांची अचूक पारख हा यशवंतरावांचा मोठा गुण िवशेष होता. यशवंतरावांचा सहवास, यशवंतरावांशी चर्चा हे माझ्यासाठी एका िवद्यापीठासारखे राजकीय िशक्षण होते असे वाटते. अशा या नेत्याची महाराष्ट्र आठवण िवसरत असेल तर आपल्या हातानेच आपल्या महाराष्ट्राचे नुकसान करुन घेवू. ऐेवढेच या निमित्ताने सांगायचे आहे. यशवंतरावांचा प्रवास सह्याद्री ते िहमायल असा आहे. त्यामुळे त्यांची उंची हि मायला ऐवढीच आहे. अशा या यशवंतरावांच्या जन्म िदनाच्या िदवशी मला िशरुर येथील बोरा महािवद्यालयात व्याख्यानाकरीता आमंित्रत केले होते. मी कबूलही केले होते. पण आधीच्या दोन िदवसांतील नअन्य कार्यक्रमात उन्हामुळे असा काही शेकून िनघालो की जायला असमर्थ ठरलाे. त्याची खंत वाटते-----. कबूल करुन जाता न येणे हा काहीसा अपराध आहे. त्या महािवद्यालयाच्या आयोजकांची क्षमा मािगतली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.